अन् त्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन; ठेवीदाराला छळणाऱ्या ‘त्या’ बॅंकेची ब्रँड ॲम्बेसेडर प्राजक्ता माळी

अन् त्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन; ठेवीदाराला छळणाऱ्या ‘त्या’ बॅंकेची ब्रँड ॲम्बेसेडर प्राजक्ता माळी

Bank Brand Abassidor Prajkta Mali : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Beed) जिल्ह्यातील गेवराई शहरात मुलीच्या लग्नाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बापाने खासगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्या बॅंकेची ब्रॅंड अम्बॅसिडर ही प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. त्यावरून आता आपचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी बॅंकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सरकारला यावरून त्यांनी खडसावले आहे.

काय म्हणाले विजय कुंभार?

ठेवीदाराच्या आत्महत्येनंतर गाजत असलेल्या छत्रपती मल्टीस्टेटच्या लुटीचा खेळ! प्राजक्ता माळी सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रॅंड अम्बॅसिडर बनवून, मोठमोठ्या परताव्याच्या खोट्या जाहिरातींनी गुंतवणूकदारांना लुबाडलं. संस्थेचा अध्यक्ष संतोष भंडारी याने ठेवीदारांचे पैसे स्वतःच्या वाढदिवसावर पाण्यासारखे खर्च केले. जाहिराती आणि वाढदिवसावर उधळपट्टी करणाऱ्यांकडे ठेवीदारांचे परत द्यायला मात्र पैसे नाहीत! आणि ही मूकबधीर यंत्रणा? ती फक्त बघत राहणार, कारवाई तर सोडाच!

नेमकं प्रकरण काय?

गेवराईमधील छत्रपती मल्टीस्टेट या खासगी बँकेसमोर ठेवीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. सुरेश जाधव यांची 11 लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार पैसे मागूनही बँकेकडून पैसे दिले जात नसल्याने जाधव यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न, एका वाक्यातच संपवला विषय

जाधव यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिासांनी मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास करण्यात येत आहे. रक्कम किती होती आणि याबाबतची इतर संपूर्ण माहिती घेऊन रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे. या प्रकारानंतर गेवराईमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अन् त्यानं बँकेसमोरच संपवलं जीवन; ठेवीदाराला छळणाऱ्या ‘त्या’ बॅंकेची ब्रँड ॲम्बेसेडर प्राजक्ता माळी

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव मधील ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र, सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube