प्रेयसीच्या होकारासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला; तीन तासांनी उतरला ‘सांगलीचा धर्मेंद्र’

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

News Photo   2026 08 08T193420.727

प्रेयसीच्या होकारासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला; तीन तासांनी उतरला ‘सांगलीचा धर्मेंद्र’

‘शोले’ चित्रपटातील गब्बरसिंगचे संवाद, जय-विरूची मैत्री आणि बसंतीच्या प्रेमासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेला विरू आजही (Kolhapur) प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. याच प्रसंगाची आठवण करून देणारी घटना सांगलीतील कुपवाड परिसरात घडली. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने प्रेयसीने होकार द्यावा, या मागणीसाठी थेट मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा घातला. या प्रकारामुळं पोलीस, अग्निशमन दल आणि शासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

अजय जाधव असं या तरुणाचं नाव आहे. कुपवाड परिसरात राहणारा अजय शनिवारी दुपारी अचानक एका गगनचुंबी मोबाईल टॉवरवर जाऊन बसला. ‘प्रेयसी घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही’, अशी भूमिका त्याने घेतली. प्रेयसीने आपल्याला प्रेमासाठी होकार द्यावा, अशी मागणी करत त्याने टॉवरवरून खाली येण्यास नकार दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

जुगल हंसराज पुन्हा एकदा शेखर कपूरसोबत ‘मासूम: द नेक्स्ट जनरेशन’ मध्ये एकत्र येणार !

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरविण्यासाठी पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, ही बातमी परिसरात पसरताच टॉवरभोवती बघ्यांची मोठी गर्दी झाली. तरुण टॉवरवर चढल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे आणि त्यांच्या पथकाने अथक प्रयत्न करत तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्याला सुरक्षित खाली उतरण्याचे आश्वासन देत पोलिसांनी त्याची समजूत काढली. पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि तब्बल तीन तासांनंतर अजय टॉवरवरून खाली उतरला. या घटनेमुळे सांगलीत ‘शोले’मधील विरूच्या प्रेमप्रसंगाची आठवण करून देणारा ‘सांगलीचा धर्मेंद्र’ चर्चेचा विषय ठरला.

Exit mobile version