Aaditya Thackeray Eknath Shinde Meet : शिवसेना पक्षफुटीनंतर पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अन् एकनाथ शिंदे आमने-सामने आलेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी देखील विधीमंडळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समोरासमोर आले होते. त्यावेळी मात्र त्यांनी एकमेकांशी संवाद साधला नव्हता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
विधानसभा सभागृहात एका बैठकीसाठी आमदार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे ( Thackeray VS Shinde) एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंची एंट्री झाली, याचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये एकनाथ शिंदे यांची बैठकीसाठी एंट्री होताच सभागृहातील सर्वजण उठून उभे राहिले. परंतु, आदित्य ठाकरे बसूनच असल्याचं पाहायला मिळतंय.
‘…तरच माफी मागेन’, कुणाल कामराने पोलिसांसमोर ठेवली मोठी अट
मुंबईत रस्ते कामाच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरेंसह इतर नेते देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे हे समोरील खुर्चीवरून बसून एकनाथ शिंदे यांना एकटक पाहात (Maharashtra Politics) होते, तर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंकडे पाहिलं देखील नव्हतं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
मुंबईतील रस्त्यांच्या क्राॉक्रीटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, ही मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती. ही मागणी एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या चौकशीची मागणी करणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
‘कोरटकरला वाचवणारी यंत्रणा…जनतेसमोर आणा’ अटकेनंतर, इंद्रजित सावंत यांची मोठी मागणी
पक्षफुटीनंतर प्रथमच ठाकरे अन् शिंदे एका बैठकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आले होते. यावेळी सभागृहातील सर्वांनी एकनाथ शिंदे येताच आदर दर्शवला. मात्र आदित्य ठाकरे उभे राहिले नाही, त्यांनी आदर दिल्याचं दिसलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.