गोरेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) मेळावे होत आहे. प्रत्येक मेळाव्यावेळी लोकं उत्स्फूर्तपणे लोकं गद्दार गटाला शिव्या देत आहे. त्यामुळे निराश झालेले गद्दारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत लॉबीमध्ये गद्दार गटाचे आमदार आमच्याशी येऊन चर्चा करत आहे. आम्हाला उद्धव ठाकरे पुन्हा घेतील का, पण आम्ही त्यांना सांगतो. तुम्ही तिकडेच बरे आहात. पक्षाशी, महाराष्ट्राशी गद्दार करणारे आमच्याकडे नकोच, असा दावा युवासेनेचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाबद्दल केला आहे.
गोरेगाव येथे ‘शिवगर्जना’ कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना युवासेनेचे आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुभाष देसाई, अनिल देसाई, रवींद्र वायकर, प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपला आता प्रश्न पडत आहे. आपण जे काही घडवून आणलं आहे. ते बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण त्यांच्या पदवीधर, शिक्षक आणि पोटनिवडणुकीतून त्यांचा जनतेने पराभव केला आहे. त्यामुळे भाजपमधील मोठ्या नेत्यांना प्रश्न पडायला लागले आहेत. ४० गद्दारांतून एकही आमदार पुढे येऊन म्हटले नाही की आम्ही खोके घेतले नाही. कारण खोके घेऊन बसले असल्याने आता कोणत्या तोंडाने कसे म्हणतील.
मिंधे गटामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यात आतापर्यंत जात होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय दिल्लीतून चालवले जात आहे. इतकं महाराष्ट्राची बदनामी गेल्या ६० वर्षात कधी झाला नव्हता. एवढ्या महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचे काम एकनाथ शिंदे हे करत आहे. या गद्दारांना महाराष्ट्राची जनता घरी पाठवणारच आहे. त्यामुळेच मिंधे गटातील गद्दार अस्वस्थ झाले आहेत, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटावर केली.