Suraj Chavan Arrested ED : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) जवळचा सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला अटक केली आहे. कोरोना काळात गरिब मायग्रेन कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेकडून 52 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले पण यामध्ये घोटाळा झाल्याच आरोप करण्यात आला आहे.
सीमाभागातील तुमची ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजना बंद करा! सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राला दरडावले
मुंबई महापालिकेकडून कोरोना काळात गरिब मायग्रेन कामगारांच्या जेवणासाठीचं कंत्रात काही कंपन्यांना देण्यात आलं होतं. या कंत्राटांमार्फत ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही अशा लोकांना खिचडीचे पॅकेट देण्याचं काम सुरु होतं. लॉकडऊन काळात लोकांची जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय महाविकास सरकारने घेतला होता. सरकारच्या या निर्णयाला केंद्र सरकारकडूनही हिरवा कंदील दिला गेला होता. त्यानूसारच महापालिकेकडून हे कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, यामध्ये घोटाळ्या झाल्याचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल होता. त्यानंतर या प्रकरणी मुंबई अर्थिक गुन्हे शाखेकडून संजय राऊतांचे जवळचे सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, यांची चौकशीही करण्यात आली होती.
मुंबईत मोकाट रेडे, बंदोबस्त करण्याची योजना सुचवा; फडणवीसांकडून ठाकरे-राऊतांना ‘रेड्या’ची उपमा
या प्रकरणी चौकशीअंती सुरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं समोर आलं होतं. अमोल किर्तीकरच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण याच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्याचं उघड झालं होतं. याबाबत सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स देऊन जबाब नोंदवला होता. त्यानंतर आता या प्रकरणी सुरज चव्हाण याला ईडीकडून अटक करण्यात आली आहे.