मुंबईत मोकाट रेडे, बंदोबस्त करण्याची योजना सुचवा; फडणवीसांकडून ठाकरे-राऊतांना ‘रेड्या’ची उपमा
Devendra Fadnvis : मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्याची आधुनिक योजना असेल तर आम्हाला सुचवा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचा रोख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर असल्याचं दिसून आलं आहे. कारण ठाकरे गटाच्या नेत्यांकडून काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल करण्यात आली आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, उद्धव ठाकरे, अनिल परब यांनी सत्ताधारी सरकारसह नार्वेकरांवर गंभीर आरोपही केले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, साताऱ्यात अतिशय चांगल स्टेडिअम निर्माण केलं जाणार आहे. या प्रदर्शनात 42 लाख रुपयांचा बैल आला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक बैलही असून सर्वात छोटी गायदेखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मुंबईत काही रेडे मोकाट सुटले आहेत, ते टिव्हीवर बोलत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही आधुनिक योजना असेल तर आम्हाला सुचवा, अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Weather Update : राज्याला भरली हुडहुडी! पुढील 5 दिवसांत ‘या’ राज्यांत थंडीची लाट; रेड अलर्ट जारी
साताऱ्यातील कराडमध्ये आज कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मुंबईतील मोकाट रेड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही तंत्रज्ञान आलं असेल तर सुचवा, असं व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना उद्देशून म्हंटलं आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण, एका दिवसात गुंतवणुकदारांना 1.12 लाख कोटींचा फटका
दरम्यान, साताऱा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घ्यावी, असं आवाहनही देवेंद्र फडणवीसांनी केलं असून सातारा जिल्ह्यात पुढील काळात दुष्काळ हे नावही राहणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आम्ही हाती घेतलीयं. त्यासाठी फीडर सौरवर आणत असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज अखंडितपणे देता येणार आहे. शेतकऱ्यांना ही सोलरची वीज तीन रुपयांत देत आहोत. हा एक महत्वकांक्षी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी हाती घेत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.