शेअर बाजारात मोठी घसरण, एका दिवसात गुंतवणुकदारांना 1.12 लाख कोटींचा फटका

शेअर बाजारात मोठी घसरण, एका दिवसात गुंतवणुकदारांना 1.12 लाख कोटींचा फटका

Share Market : शेअर बाजारात गुंतवणुकदारांना (Investors)मालामाल केल्यानंतर आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारात Share Marketचांगलीच पडझड पाहायला मिळाली. आज वरच्या पातळीवर प्रॉफिट बुकींगमुळे (Profit booking)बाजारात घसरण पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांनी आयटी (IT)आणि एनर्जीच्या (Energy)शेअर्समध्ये प्रॉफिट बुक केल्यामुळे दोन सत्रांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आजच्या ट्रेडिंग काळाच्या शेवटी BSE सेन्सेक्स 199 अंकांच्या घसरणीसह 73,128 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 65 अंकांच्या घसरणीसह 22,032 अंकांवर बंद झाला.

Ankita Lokhande: अंकिताने टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डच्या रूपाने मिळवलं यश

शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंगमुळे बाजार भांडवल घसरले आहे. BSE वर लिस्टेड शेअर्सचे बाजार भांडवल 375.02 लाख कोटींपर्यंत खाली आले आहे ते बाजार भांडवल मागील सत्रात 376.14 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 1.12 लाख कोटी रुपयांची घट दिसून आली आहे.

आजच्या ट्रेडिंग काळात एफएमसीजी, मेटल, मीडिया, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळाली.

ऑस्कर नामांकित दिग्दर्शक शेखर कपूरचा सिनेमॅटिक प्रवासच डिजीमॉन हौनसौनं केलं तोंडभरून कौतुक

सकाळी तेजीत व्यवहार करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 11 शेअर्स वाढीसह आणि 19 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 16 शेअर्स वाढीसह आणि 34 शेअर्स तोट्यासह बंद झाले.

आज ट्रेडिंग काळात टाटा स्टील 1.70 टक्के, टायटन कंपनी 1.61 टक्के, मारुती सुझुकी 1.13 टक्के, आयटीसी 1.01 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.92 टक्के, लार्सन 0.88 टक्के, टाटा मोटर्स 0.81 टक्के वाढीसह बंद झाले.

तर दुसरीकडे पेंट्स 0.72 टक्के. एचसीएल टेक 2.05 टक्के, विप्रो 1.93 टक्के, एनटीपीसी 1.84 टक्के, रिलायन्स 1.43 टक्क्यांनी घसरुन बंद झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube