Ankita Lokhande: अंकिताने टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डच्या रूपाने मिळवलं यश

Ankita Lokhande: अंकिताने टाइम्स स्क्वेअर बिलबोर्डच्या रूपाने मिळवलं यश

Bigg Boss 17 Ankita Lokhande: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमामध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे अनेकदा भांडताना दिसतात. बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे. अंकिता या घरात कायम चर्चेत असते आणि अश्यातच ती प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)


प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर अंकिताची उपस्थिती हे तिच्या ग्लॅमरच प्रतीक आहे. रिअ‍ॅलिटी शो पासून दर्जेदार मालिकापर्यंत तिची ओळख आहे. सामर्थ्य आणि अस्सल स्वत:चे विशेष मिश्रण तिला बिग बॉसमध्ये वेगळे बनवते आणि देशभरातील लोकांना मोहित करते. हा क्षण सिद्ध करतो की, अंकिताचा प्रभाव किती वाढत आहे आणि ती मनोरंजन विश्वात किती प्रभाव पाडत आहे.

अंकिता लोखंडेने केवळ बिग बॉसच्या घरातच विजय मिळवला नाही, तर जागतिक स्तरावर स्वतःचा प्रभाव टाकला आहे. टाइम्स स्क्वेअरच्या प्रतिष्ठित पडद्यावरही तिने आपला करिष्मा दाखवून दिला आहे. आता आशा आहे की तिने प्रतिष्ठित बिग बॉस 17 ट्रॉफी जिंकली पाहिजे, असा चाहत्यांनी विश्वास दाखवला आहे.

Purshottam Berde : ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ नाटक लवकरच येणार रंगभूमीवर

अंकिता लोखंडेने डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत शाही विवाह केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांनी ऑक्टोबरमध्ये बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केला होता. या घरात ते अनेकदा एकमेकांशी भांडतात. ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट, मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. प्रेक्षक बिग बॉसच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube