Aapla Mavla Sanghatana Six Fort Conservation Campaign At Pratapgad : शिवकालीन गडकोटांचे संवर्धन व स्वच्छता यासाठी ‘आपला मावळा संघटने’च्या (Aapla Mavla Sanghatana) वतीने प्रतापगडावर (Pratapgad) सहावी दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात मोठ्या संख्येने मावळ्यांनी (Nilesh Lanke) उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पर्यटक अन् भाविकांना स्वच्छतेचा संदेश
या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील झाडाझुडपं आणि कचरा हटविण्यात (Ahilyanagar) आला. तसेच पर्यटक अन् भाविकांना स्वच्छतेचा संदेश मिळावा, यासाठी संघटनेच्या वतीने किल्ल्याच्या ठिकठिकाणी कचरा पेट्या आणि नामफलक लावण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे अन् माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
मद्यव्यवसायात राजकीय मेजवानी! 328 परवाने भाजप अन् राष्ट्रवादी नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या खिशात
गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन
‘आपला मावळा संघटने’चे अध्यक्ष निलेश लंके म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांनी जो गडकिल्ल्यांचा ठेवा ठेवला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन होणं, अधिक महत्त्वाचं आहे. गडकोट हा आपला इतिहास, आपलं प्रेरणास्थान आहे. त्यांना जतन करणे आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.
संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध गडांवर संवर्धन उपक्रम राबविण्यात आले असून, पुढील काळातही ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे लंके यांनी सांगितले.