CM Eknath shinde : आषाढी वारीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्या हस्ते सपत्निक पांडुरंगाची शासकीय महापूजा (Mahapooja)पार पडली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाकडे राज्यभरातील बळीराजाला चांगले दिवस येऊदे, शेतकऱ्यावरील सर्व संकटं दूर होऊदे, चांगला पाऊस पडूदे, आपले राज्य सुजलाम् सुफलाम् होऊदे, प्रत्येक माणसासाठी समृद्धीचे दिवस येऊदे अशी मागणी केली आहे. यावेळी आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी शासकीय महापूजेचा मान मिळाला याबद्दल आपल्याला भाग्यवान मानतो अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.(aashadhi wari 2023 CM Eknath shinde vitthal rukmini mahapooja May it rain well)
पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांचे, भाविकांचे स्वागत केले. त्याचबरोबर भाविकांना एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज संपूर्ण पंढरपूर वारकरीमय झाले आहे. सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सलग दुसऱ्या वर्षी आपल्याला विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले.
Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांसोबत नगर जिल्ह्यातील वारकऱ्याला शासकीय महापूजेचा मान
याप्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, सोलापूर जिल्ह्याचेपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत, गिरीश महाजन, दीपक केसरकर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
त्याचवेळी बळीराजाला चांगले दिवस येऊदे, शेतकऱ्यावरील सर्व संकटं टळू दे, अवघा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, हेच मागणं आपण विठुरायाकडे केल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर संपूर्ण प्रशासनाने चांगले आयोजन केल्याचे म्हणत सर्वांनी त्यासाठी सहकार्य केल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आज आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक पार पडली. त्याचसोबत मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांना मान मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते या दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.