भाजप मुंडकं उडवतयं, आमच्या नेत्याने निर्णय घ्यावा; सत्तारांचे भाजपवर आरोप अन् शिवसेनेच्या एकत्रि‍करणाची इच्छा

Abdul Sattar यांनी थेट मुलाचा अपक्ष अर्ज भरत भाजपवर खळबळ जनक आरोप आणि थेट दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठा विधान केलं आहे.

Abdul Sattar

Abdul Sattar

Abdul Sattar alligations on BJP and desire for Shiv Sena’s unification : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरू झाला आहे. यामध्ये शिंदे यांचे आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट मुलाचा अपक्ष अर्ज भरत भाजपवर खळबळ जनक आरोप आणि थेट दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठा विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अब्दुल सत्तार?

दरम्यान छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघाची जागा भाजपला सुटल्याने या ठिकाणी भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. मात्र नाराज असलेल्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांचे पुत्र समीर सत्तार यांचा अपक्ष अर्ज दाखल केला.

विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार मग, टिंगरेंनी अर्ज का भरला?; वळसे पाटलांनी सांगितलं ‘राजकारण’

त्यानंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भाजपवर प्रचंड टीका केली. ते थेट म्हणाले की आमचा मित्र पक्ष आमच्या पक्षाचं मुंडक छाटतोय. आमचा त्याग गुवाहाटीतील कामख्या देवीला माहिती आहे पण तो भाजप विसरलाय. ते आमच्यात गट पाडत आहेत आणि आमचे हात पाय त्यांनी अगोदरच तोडले आहेत. त्यात आता मुंडक देखील छाटत आहेत.

एकनाथ शिंदे यांचं पुन्हा एकदा धक्कातंत्र; परभणी-हिंगोलीत मात्तबर बाजूला करत नव्या चेहऱ्याला संधी

कारण आमची जिल्हा परिषद गेली. महानगरपालिकेत शिवसेना बाळासाहेब ठाकरेंपासून असलेली सत्ता गेली. आता विधान परिषदेतही तेच आमच्या हातात काहीही राहिलेलं नाही. आम्हाला संपवलं जात आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे म्हणाले तसं मलाही वाटतं की, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे त्यासाठी आमच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याचा निर्णय घ्यायला हवा आणि तो जे निर्णय असेल. असं म्हणत सत्तार यांनी थेट दोन्ही शिवसेना एकत्र करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Exit mobile version