विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार मग, टिंगरेंनी अर्ज का भरला?; वळसे पाटलांनी सांगितलं ‘राजकारण’
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.
Why Sunil Tingre Fill Pune Vidhan Parishad Election Nomination Form : विधान परिषदेसाठी रविवारी (दि.31) रात्रीपर्यंत पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती की, सुनील टिंगरे किंवा विलास लांडे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार. मात्र, मध्यरात्री अचानक चक्रे फिरली आणि नाट्यमयरित्या एका नव्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. पण, सोमवारी सकाळी हा सस्पेन्स आणखीच वाढला. कारण, जेव्हा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या विक्रम काकडे यांच्यासोबतच सुनील टिंगरे यांनीही अचानक आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे विधान परिषदेसाठी ‘राष्ट्रवादीचा खरा उमेदवार नेमका कोण?’ या प्रश्नाने संपूर्ण पुण्याच्या राजकारणात प्रचंड संभ्रम आणि खळबळ उडवून दिली. अखेर दुपारी या हाय-व्होल्टेज ड्राम्यावर पडदा टाकत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांसमोर येत या संपूर्ण सस्पेन्समागचा मोठा खुलासा करत पडद्यामागचं राजकारण सांगितलं आहे.
तनपुरेंसाठी महायुती एकवटली मात्र आमदार जगतापांची अनुपस्थिती… नाराजीच्या चर्चांना उधाण
विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार; मग टिंगरेंनी अर्ज का भरला?
विक्रम काकडे यांनी दोन आणि सुनील टिंगरे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. यात काहीही वावगे किंवा नवीन नाही, ही एक जुनी राजकीय परंपरा असून कायद्यानेही त्याला मान्यता दिली आहे. ते म्हणाले की, “ज्यावेळी आपण अर्ज भरतो, त्यावेळी निवडणूक कायद्यानुसार मुख्य उमेदवारासोबत एक डमी उमेदवार देण्याची तरतूद असते. दुर्दैवाने काही तांत्रिक कारणांमुळे किंवा त्रुटींमुळे मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर पक्षाची जागा सुरक्षित राहावी म्हणून पर्यायी उमेदवार हाच पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो.” पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हे विक्रम काकडेच आहेत, असे वळसे पाटलांनी स्पष्ट केले.
नात्यात सुप्रिया सुळेंचे व्याही, पण मैदानात भाजपचे शिलेदार; अरुण लखानी यांना उमेदवारी का मिळाली?
ऐनवेळी का बदलली समीकरणे?
पुणे विधान परिषद मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांच्यासह अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांची नावे आघाडीवर मानली जात होती. मात्र, ऐनवेळी संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना मैदानात उतरवून राष्ट्रवादीने पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांना (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य) आकर्षित करण्यासाठी एक नवा आणि तरुण चेहरा देण्याचा डाव खेळल्याचे बोलले जात आहे. आता सुनील टिंगरे हे केवळ ‘डमी’ उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल्यामुळे सकालपासून सुरू असलेल्या सस्पेन्सवर पूर्णविराम मिळाला आहे.