Download App

कार्यक्रमातील लोकं सुरक्षित घरी जावे म्हणून तशा शब्दांचा वापर; ‘त्या’ वक्तव्यावर सत्तारांची सारवासारव

Abdul Sattar : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच स्वतःची आणि सरकारची कोंडी करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हातात कोलित दिलं होतं. मात्र आपल्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘त्या’ वक्तव्यावर सत्तारांची सारवासारव

कालच्या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार लोकं आले होते. या लोकांमध्ये विरोधी पक्षाची लोकं पाठवून कार्यक्रम उधळण्याचा कट होता. त्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी ग्रामीण भागातील बोलीमध्ये मी बोललो आहे. याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका-कुशंका निर्माण झाली असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कालच्या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेली हुल्लडबाजी भविष्यात करु नये अशी विनंती. या कार्यक्रमामध्ये आलेली हजारो लोकं सुरक्षित आपल्या घरी जावेत व परिस्थिती कंट्रोलमध्ये रहावी. यासाठी काही शब्दांचा वापर केला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, अशा हुल्लडबाज लोकांना पाठवून असा प्रकार करु नये. असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच….; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित

काय म्हटले होते अब्दुल सत्तार?

मंत्री सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल्यानंतर लोकांची प्रचंड गर्दीही झाली. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. हा प्रकार पाहून मंत्री सत्तार चांगलेच संतापले. संतापाच्या भरात पोलिसांना लाठीचार्जचे आदेश दिले. कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा. एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे, असे शब्द सत्तार यांच्या तोंडून बाहेर पडले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे.

Devendra Fadanvis लाज वाटू द्या, शरम करा, पुण्यातील ‘त्या’ मुलीला न्याय नाहीच; खडसे संतापले

दरम्यान सत्तारांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विट करत टीका केली. त्यांनी यामध्ये सत्तारांच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ते म्हणाले की, महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा ! मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला.

हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील “गुंड” समजतात का ? सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई बापांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम ? अशा शब्दांत वडेट्टीवारांनी टीका केली.

follow us

वेब स्टोरीज