मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच….; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित

  • Written By: Published:
मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच….; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद प्रकल्प (Mahanand Milk) गुजरातला जाणार यावरून सध्या राजकारणाला उकळी फुटली आहे. विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) हे का घडलं याबाबत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी हे सर्व घडण्यामागचं गुपित उघड करत राधाकृष्ण विखे पाटलांना उत्तर देण्याचे आवाहन केले आहे. आपल्या म्हेव्हण्याचा लाड पुरवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राजेश नामदेवराव परजणे हे मंत्रालयात बसून महानंदचा कारभार पाहत असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. आता राऊतांच्या या आरोपांवर विखे काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune : खासदार सोडा आमदारही होऊ देणार नाही; धंगेकरांना भाजप शहराध्यक्षांचं ओपन चॅलेंज!

महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?

राऊतांनी केलेल्या ट्विटमध्ये राऊतांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर (महानंद) शासनाचे संचालक मंडळ होते. शासनाचे दुग्ध मंत्री चेअरमन होते व दुग्ध खात्याचे राज्यमंत्री व्हाईस चेअरमन होते त्यावेळी आठ लाख लिटर दूध विक्री होती. तसेच अतिशय चांगल्या प्रकारे त्याचे कार्य सुरू होते असेही राऊतांनी म्हटले आहे.

लोकनियुक्त संचालक मंडळ आल्यापासून चांगले चालू होते. परंतु सध्या दुग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेव्हणे राजेश नामदेवराव परजणे हे महानंदचे अध्यक्ष आहेत आणि हे आल्यापासून महानंदला उतरती कळा लागली आहे. परजणे महिन्यातून एकदा येऊन महासंघ चालवीत आहेत, महासंघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महासंघाचे पॅकिंग विक्री पूर्णपणे कमी झाल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. याचा कामगार संघटनेनेही त्यांना जाब विचारला होता.

आव्हाडांचा पवार कुटुंबियांशी थेट पंगा; रोहित पवार लहान, त्यांच्या विधानाकडे लक्ष देत नाही

म्हणून हा सर्व खटाटोप

यावेळी राऊतांनी महासंघाची 27 एकर जागा व NDDB ला पूर्वी दिलेली पाच एकर अशी एकूण 32 एकर जागा हडप करण्यासाठी म्हणून महानंद NDDB च्या म्हणजे गुजरात लॉबी च्याघशात घालण्याचा डाव असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube