Mahanand Dairy : ‘महानंद’चा कारभार ‘एनडीबीबी’च्या दावणीला; गुजरातस्थित संस्थेला ग्रीन सिग्नल?
Mahanand Dairy : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाण्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ उठलेला असतानात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ मर्यादीत, मुंबई म्हणजेच महानंदच्या (Mahananad Dairy) संचालक मंडळाने ‘महानंद’ राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला (एनडीडीबी) चालविण्यासाठी द्यावे असा ठराव सरकारला पाठवला आहे. त्यामुळे महानंदही एनडीबीबीकडे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जर असं झालं तर राज्य सरकारला हा आणखी एक मोठा धक्का असेल. या ठरावावरून वाद होण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत.
तसं पाहिलं तर राज्य सरकारचं दुर्लक्ष, संस्थेतील अनागोंदी कारभार, दूध संकलनातील घट, पिशवी बंद दूध वितरणाचे घटलेले प्रमाण, प्रक्रिया प्रकल्पांना दूध मिळण्यातील अडचणी, कर्मचाऱ्यांचे रखडलेल पगार या काही कारणांमुळे महानंद एनडीडीबीला चालवण्यासाठी देण्याची मागणी केली जात होती. विशेष म्हणजे, राज्य सरकारनेही याकामी पुढाकार घेतला. त्यानंतर महानंदच्या संचालक मंडळाने 28 डिसेंबर रोजी ठराव मंजूर करून राज्य सरकारला पाठविण्यात यावा, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा ठराव राज्य सरकारला सादर करण्यात आला. आता या ठरावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mahanand Milk Federation : बहुमत राष्ट्रवादीला; मात्र ‘महानंद’ची सूत्रे विखे पाटलांच्या हाती
आर्थिक तोटा वाढत चालल्याने महानंद डेअरी अडचणीत येत आहे. डेअरी एनडीडीबीला चालविण्यासाठी देण्याऐवजी राज्यातील एखाद्या सक्षम संस्थेकडे द्यावी अशी मागणी सहकारी दूध संघांनी केली आहे. महानंद ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था आहे. महानंदमार्फत राज्यातील सहकारी दूध संघांच्या दुधाची खरेदी विक्री केली जाते. महानंदचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात असून प्रामुख्याने मुंबईत आहे.
महानंदच्या अध्यक्षांचा राजीनामा ?
कर्मचाऱ्यांचा वाढता रोष आणि सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दोन महिन्यांपूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. उर्वरीत महाराष्ट्र विभागातून राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे बहुमत असताना महानंदच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांना आपले सख्खे मेहुणे राजेश परजणे यांची वर्णी लागली होती.
महानंदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले आहे. आता महानंद अडचणीत आला असून. दूध संकलन, वितरण कमी झाल्यामुळे कामगारांचे पगार भागविण्याइतकीही आर्थिक ताकद महानंदमध्ये राहिली नाही. महानंद अडचणीतून बाहरे यावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महानंदची सर्व सूत्रे दिली. त्यामुळे, महानंदच्या अध्यक्षपदी विखेंनी राजेश परजणे यांची वर्णी लावली, असे सांगितले जात होते. मात्र येथील परिस्थिती पाहता काही दिवसांतच राजेश परजणे यांनीही राजीनामा दिला. परंतु, त्यांचा राजीनामा संचालक मंडळाने स्वीकारला नव्हता.
दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता तीन महिन्याला दुधाचा भाव ठरणार