दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता तीन महिन्याला दुधाचा भाव ठरणार

  • Written By: Published:
दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता तीन महिन्याला दुधाचा भाव ठरणार

Milk Price: गेल्या काही दिवसांपासून दूधाच्या भावात घसरण होत आहे. त्याचा दूध उत्पादकाला मोठा फटका बसत आहे. गाईच्या दूधाचे भाव लिटरमागे ३८ रुपयांवर गेले होते. परंतु काही दिवसांत भावात मोठी घसरण झाली आहे. लिटरमागे तब्बल आठ रुपये भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी खासगी व सहकारी दूध संस्थांना गायीच्या दूधाला किमान ३५ रुपये भाव देण्याचा आदेश दिला होता. (important news for milk-producers now the price of milk will be in three months)

हॉटेल रुमचे भाडे वाचून डोळे होतील पांढरे; वर्ल्डकपआधीच भारत-पाक सामन्याचा उत्साह शिगेला

दुधाचे भाव निश्चित करण्यासाठी आता राज्य सरकारने समितीची नेमणूक केली आहे. दर तीन महिन्यानंतर ही समिती गाई आणि म्हशीच्या दुधाचे भाव निश्चित करणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा हा मोठा निर्णय आहे. या समितीमध्ये 11 सदस्य असणार आहे. दुग्धव्यवसाय आयुक्त समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर महानंदाचे अध्यक्ष, खासगी आणि सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी समितीचे सदस्य असणार आहेत.

Delhi Liquor Sale : तळीराम सुधारले! मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीत मोठी घट…

राज्यातील दूध संकलन हे खासगी आणि सहकारी दूध संघाकडून केले जाते. दुधाच्या कृष काळात दूध उत्पादन कमी असते. त्यामुळे दुधाच्या भावात वाढ होते परंतु ज्यावेळी दुधाचे उत्पादन वाढते. त्या काळात मात्र खासगी व सहकारी दूध संघाकडून दूध कमी दराने स्वीकारले जाते. त्यामुळे दूध उत्पादनांना आर्थिक फटका बसतो. या बाबी लक्षात घेत सहकारी व खाजगी दूध संघाचा चालवण्याचा खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाला किमान दूध भाव मिळण्यासाठी व दुधाचे भाव निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.

समितीत कुणाचा समावेश ?

दूध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त हे अध्यक्ष असणार आहेत. तर उपायुक्त हे सचिव असणार आहे. यामध्ये महानंदाचे अध्यक्ष, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचा प्रतिनिधी सदस्य आहेत. खाजगी दूध संघाच्या प्रतिनिधीमध्ये इंदापुरातील सोनाई दूध संघाचे प्रतिनिधी, चितळे डेअरी भिलवडी व ऊर्जा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या तीन प्रकल्पांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकारी दूध संघामध्ये जळगावच्या जिल्हा दूध उत्पादक, वारणा सहकारी दूध संघ, संभाजीनगर, कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा समावेश करण्यात आला आहे.

दुधाचा दर कसा ठरणार ?

या सर्व संघांचे प्रतिनिधी व सरकारी प्रतिनिधी दर तीन महिन्यांनी बैठक घेतील. त्यात राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघाकडून जे दूध संकलित होत आहे, त्या दुधाच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईंना दूधाला, म्हशीच्या दुधास दिला जाणारा किमान दूध दर निश्चित करतील. या दुधाला दूग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त शासनाची मान्यता घेतील आणि हा दूध भाव कोणतीही कपात न करता दूध उत्पादकांना देणे हे राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघांना बंधनकारक राहील. अशा प्रकारचा हा आदेश देण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube