Download App

राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण… अब्दुल सत्तारांनी घेतला यूटर्न

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढा अन् विखेंना मुख्यमंत्री करा, असं मी बोललो नसल्याचं स्पष्टीकरण कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील, असं विधान सत्तार यांनी केलं होतं. अखेर या वक्तव्यानंतर सत्तार यांनी युटर्न घेतला आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मंत्री सत्तार म्हणाले, राधाकृष्ण विखे आणि मी मागील 25 वर्षांपासून सोबत आहोत. त्यानंतर विखे भाजपमध्ये गेले आणि मी शिवसेनेत आलो. आम्ही आतल्या गाठीचे मित्र असून याचा अर्थ असा होत नाही की, मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना काढा आणि विखेंना मुख्यमंत्री करा, हे मी बोललेलो नाही, असं सत्तार यांनी सांगितलं आहे. तसेच मला जे मुख्यमंत्री आवडतात ते तुम्हाला आवडत नाहीत, असं मिश्किलपणे पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना विचारात घेऊनच …. बारसु प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं आहे. जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. तर एकनाथ शिंदेंनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या काळात महसूल विभागात महत्त्वाचे निर्णय होत आहेत. तसेच कुणाला नाही वाटत आपला मित्र मुख्यमंत्री व्हावा, असं विधान अब्दुल सत्तारांनी केलं होतं.

“होय, मी पत्र दिलं होत. पण…” बारसू रिफायनरीच्या ‘त्या’ पत्रावरून उद्धव ठाकरे यांचं उत्तर

ज्यावेळी सत्तारांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या सोबतच होते. ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी गारपिटीच्या बाबतीत कदाचित बघितलं असेल तर वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अवकाळी पाऊस झाला आहे ते पंचनामे होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेला शेतकरी आहे.

रतन टाटांनी ऑस्ट्रेलियात वाढवली देशाची शान

तो वंचित राहणार नाही, त्यांचे पंचनामे होणार आणि आताही काही नवीन पहिलेही पंचनामे झाले पंचनामे केली जाईल. वस्तुनिष्ठ पंचनामे रब्बी असू द्या खरी असू द्या यामध्ये आता आपण बघितलं तर अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे याची निश्चित पंचनामे केले जातील झालेल्या नुकसानाची भरपाई जे काही निकष नियम आहे त्याप्रमाणे दिले जाईल. असं सांगितलं

दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतरही राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा रंगली होती. मात्र, मंत्री सत्तारांनी अखेर युटर्न घेतला असून या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Tags

follow us