शेतकऱ्यांना विचारात घेऊनच …. बारसु प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

  • Written By: Published:
शेतकऱ्यांना विचारात घेऊनच …. बारसु प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

Eknath Shinde On Action Mode : शरद पाइरांच्या भाकरी फिरवण्याचा वक्तव्यावर बाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा काय अर्थ घ्यायचा हे मी काय सांगनार ते त्यांनाच विचार. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला माहित आहेत त्यामुळे त्या गांभिर्याने घेत असतो. बारसु प्रकरणाबाबत काल माझी फोनवरुन चर्चा झाली होती. नागपुरात शिंदे यांच्या हस्ते NCI हॉस्पिटल चा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार यांना बारसू प्रकल्पा प्रकरणी फोन केला असता ते म्हणाले उद्योगमंत्री, संबंधित अधिकारी यांनी लोकांना विचारात घेतले पाहिजे. यावर मी त्यांना सांगितले आमचे सरकार कोणत्याही प्रकल्पात लोकांवर अन्याय होऊ देणार नाही. कोणताही प्रकल्प जबरदस्तीने करणार नाहीत. बारसु मधील शेतकऱ्यांना विचारात घेऊन हा प्रकल्प पुढे जाईल. काही जणांची मान्यता आहे. तिकडचे जे भुमीपुत्र आहेत त्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे घेऊन जाऊ असे मी त्यांना सांगितले.

शिंदे-अमित शाह न झालेली भेट कुणासाठी फलदायी ? कुणाला मारक ?

जसे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग केला. तिथे देखील सुरुवातीला भरपूर लोकांकडून विरोध झाला. परंतु नंतर हे सर्व प्रॉब्लेम दूर झाले आणि लोकांनी देखील विरोध मागे घेतला. याच पद्धतीने या प्रकल्पात देखील सरकार लोकांच्या समस्या सोडेल असे शिंदे म्हणाले.

बारसु प्रकल्पासाठी अनेक लोकांनी मान्यता दिली आहे. थोडेफार लोक आहेत त्यांचा विरोध आहे. परंतु सरकारची त्यांच्या सोबत चर्चा सुरु आहे. यामधून देखील नक्की मार्ग निघेल. सध्या फक्त बारसु प्रकल्पासाठी चाचणी सुरु आहे. प्रकल्प सुरु होण्यासाठी अजून बराच वेळ आहे तो पर्यंत नक्की मार्ग निघेल असा विश्वास मुख्यमंत्री यांना आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube