शिंदे-अमित शाह न झालेली भेट कुणासाठी फलदायी ? कुणाला मारक ?

Untitled Design   2023 04 27T173524.462

(प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी )

Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जाणार की राहणार ? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदी कोण असणार याचा कौल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देणार आहेत. अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एक दिवस आधीच नागपुरात दाखल झाले. पण आज अमित शाह यांनी नागपुरातले सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शाह यांची भेट होऊ शकली नाही.

शिवसेनेत फूट पडून वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. भाजपने शिंदे यांना थेट मुख्यमंत्री केले. शिवसेनेत ज्या प्रमाणे फूट पडली तशीच फूट राष्ट्रवादीत पडेल का ? अजित पवार मुख्यमंत्री होतील का ? विखे पाटील मुख्यमंत्री बनतील का ? की देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील ? अशा चर्चांना उधाण आले आहे.

चर्चा वादळं काहीही असले तरी राज्यात मुख्यमंत्री बदलाचा निर्णय भाजपमध्ये अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतील हे नक्की आहे. प्रत्येक नेता आपल्या वतीने दिल्लीत लॉबिंग करतोय. अमित शाह आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात येणार होते.

कार्यक्रम आज गुरुवारी असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. शक्यतो अमित शाह बुधवारी संध्याकाळी येतील आणि त्याची भेट होईल अशी शक्यता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन चार दिवसांसाठी सर्व कामे बाजूला ठेवत सातारा गाठले. चार दिवस ते मूळ गावी राहणार असल्याचे सांगितले जात होते.

निकिताच्या फोटोने चाहते झाले क्लीन बोल्ड

अमित शाह नागपुरात येत असल्याचे संकेत मिळताच मुख्यमंत्री यांनी नागपूर गाठल्याची चर्चा आहे. अमित शाह बुधवारी आलेच नाहीत. गुरुवारी देखील उद्घाटनाला आले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री यांचा चांगलाच हिरमोड झाल्याची चर्चा आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होईल ? शिंदे मन वळवतील ? शिंदेना कुठला सिग्नल मिळेल ? या सर्वांकडे नजरा लागल्या होत्या. पण ही भेट झाली नाही. ही न झालेली भेट कुणाच्या पथ्यावर पडली आहे यावर आता चर्चा रंगल्या आहेत.

Tags

follow us