मला भाजपकडून अनेक ऑफर्स अन् धमक्याही आल्या; अभिजीत दिपकेंच्या दाव्यावर भाजपचं प्रत्युत्तर…

Abhijit Dipke BJP response दिपके यांनी भाजप प्रवेशाची ऑफर असल्याचं म्हटलं. त्यावर लगेच भाजपचीही प्रतिक्रिया आली आहे.

Abhijit Dipke BJP Response

Abhijit Dipke BJP Response

Abhijit Dipke’s claim received offers as well as threats from BJP response : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन संपल्यानंतर त्यांच्या घरी छत्रपती संभाजीनगरला आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यात त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर असल्याचं त्यांनी एका प्रश्नावर उत्तर दिलं. तसेच आपल्याला त्यासाठी धमवकावण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यावर लगेच भाजपचीही प्रतिक्रिया आली आहे.

नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके?

भाजपकडून मला ऑफर्स आल्या होत्या, आंदोलन मागे घेण्यासाठी मला आणि आई-बाबांनाही धमक्याही आल्या, पण मी भाजपमध्ये जाणार नाही. मला जायचं असतं तर मी आधीच गेलो असतो.

नेमकं काय म्हणाले केशव उपाध्ये?

दिपकेंचं विधान धादांत खोट आहे. आंदोलनातून नवी ओळख मिळाली याचा अर्थ वाट्टेल ते बडबड करण्याचा अधिकार नाही. यश डोक्यात गेलं नाही पाहिजे. भाजपमध्ये प्रवेशासाठी कुणालाही धमक्या द्याव्या लागत नाहीत. तसेच त्यांना अशी ऑफरही देण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version