अध्यक्षांना ‘त्या’ आमदारांना अपात्र करावेच लागेल, ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितले कारण…

Abhishek Manu Singhvi : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. आता याप्रकरणावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी महत्वाचे विधान केले. अध्यक्षांनी सत्यतेचा मार्ग अवलंबला तर त्यांना या […]

Untitled Design   2023 05 11T213314.147

Untitled Design 2023 05 11T213314.147

Abhishek Manu Singhvi : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. आता याप्रकरणावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी महत्वाचे विधान केले. अध्यक्षांनी सत्यतेचा मार्ग अवलंबला तर त्यांना या आमदारांना अपात्र घोषित करावे लागणार आहे.

राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. 16 आमदारांचा विषय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणावर निर्णय देणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवल्याने शिंदे गटाला दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. यातच या मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांचे मोठं वक्तव्य

पहा काय म्हणाले ठाकरे गटाचे वकील
विधानसभा अध्यक्षांनी यावर तातडीने तसेच सत्यतेचा मार्गाचा वापर करत निर्णय द्यावा. तसेच अध्यक्षांना त्या आमदारांना अपात्र करावेच लागेल. कारण त्यांनी कायदेशीर व्हिपला डावलत बेकायदेशीर व्हिपचा आधार घेतला आहे. जर तुम्ही व्हिपचे उल्लंघन करत आहेत तर तुम्ही अपात्र ठरणारच आहात.

संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला

तुम्ही भाजपचे षडयंत्र तसेच त्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे निर्णय पहिले असतील ते या निर्णयास उशीर करतील. पण तुम्हाला योग्य निर्णयाचं द्यावा लागणार आहे. कारण चुकीचा निर्णय दिला तर तुम्हाला अडचणी तयार होतील. असे देखील ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले आहे.

Exit mobile version