आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांचे मोठं वक्तव्य

Untitled Design   2023 05 11T190145.932

Assembly Speaker Rahul Narwekar : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे सध्या देशात नसून ते सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात परतल्यावर याप्रकरणी कार्यवाही करतील. दरम्यान, नार्वेकर यांनी काही माध्यमांशी बातचित केली आणि आमदारांच्या अपात्रतेबद्दल माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर?
सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निकाल दिला आहे. आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेऊ. आम्ही याप्रकरणी लवकारत लवकर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु त्याआधी आपल्याला इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल असे नार्वेकर म्हणाले आहे.

संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला

पुढे बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वात आधी राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व नेमकं कोण करतं याचा निर्णय घ्यावा लागेल. कोर्टाने तसंच सांगितलं आहे. त्यामुळे सर्वात आधी आम्ही यावर निर्णय घेणार आहोत. यावेळी सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार देखील देण्यात येणार आहे. संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल. योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल.

आगामी निवडणुकांसाठी नितीश कुमारांनी सांगितला फॉर्म्युला

तसेच या निर्णयाला किती कालावधी जाईल याबाबत बोलताना नार्वेकर म्हणाले, मी आधी म्हटल्याप्रमाणे आमदारांच्या पात्रता-अपात्रतेआधी राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व कोण करतंय यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी व्यवस्थित चौकशी केली जाईल. पक्षाची घटना काय म्हणतेय याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सर्व याचिकांवर सुनावणी घेतली जाईल.

Tags

follow us