Download App

राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यानंतर सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही आमचं म्हणणं…

निवडणूक आयोगाच्या नोटीसीवर आम्ही आमची आमचं म्हणणं मांडलं होतं, तरीही निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानूसार आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे.

Nana Patole म्हणतात… हिंदूंचा ठेका काय फक्त भाजपला दिलाय का ? आम्ही पण अयोध्याला…

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या स्थितीचा आढावा घेतल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द होणार असल्याच्या चर्चा त्याचवेळी रंगल्या होत्या. काल अखेर निवडणूक आयोगाकडून पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.

देशातला मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रादेशिक पक्ष राहिला आहे. राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक असणारं संख्याबळ राष्ट्रवादी पक्षाकडे नसल्यामुळे आयोगानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

बाबरी पडली तेव्हा अयोध्येत बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेससोबत तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द काढून घेण्यात आला आहे. तसेच आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

दरम्यान, तटकरे म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षाची भूमिका मांडली. 19999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. आम्ही 2004 आणि 2009 च्या लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं होतं.

Chandrakant Patil : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचा चांगलं यश मिळाल्याने निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. तसेच आधीच्या निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी केली होती.

आयोगानं आम्हांला पाठविलेल्या नोटिशीत जे काही स्पष्टीकरण मागितलं होतं, त्यावर आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं. मात्र,यानंतरही निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आहे तर त्या निर्णयाची प्रत आमच्या हाती आल्यानंतर योग्य ती भूमिका नक्की घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us