Accidental death of ‘these’ big leaders in Maharashtra politics : सत्ता, पद, सुरक्षा आणि ओळख…या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट समान आहे, माणूस. महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत अनेक अनुभवी, प्रभावी नेते रस्ते आणि विमान अपघातांमध्ये अचानक गमावले. ही केवळ अपघातांची मालिका नाही, तर सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर उभाराहिलेला प्रश्न आहे. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभरात व्यक्त करण्यात येत असून देशभरातील राजकीय वर्तुळातून देखील दुःख व्यक्त केलं जात आहे. आतापर्यंत कोणकोणत्या राजकीय नेत्यांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागला.
गोपीनाथ मुंडे
माजी केंद्रीय मंत्री गोलीनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी झालेल्या भीषण रस्ते अपघातानंतर दुर्दैवी निधन झाले होते. त्या दिवशी पहाटे सुमारे सहाच्या सुमारास ते आपले सचिव आणि चालक यांच्यासह दिल्ली विमानतळाकडे निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या कारला दुसऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या भीषण अपघातात त्यांचे सचिव आणि चालक हे दोघेही सुदैवाने बचावले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक निधनाने संपूर्ण देशाच्या राजकारणात शोककळा पसरली होती. त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का बसला होता.
विनायक मेटे
दिवंगत नेते विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी झालेला अपघात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धक्कादायक ठरला. १४ ऑगस्टच्या पहाट राज्यासाठी जणू काळरात्रच ठरली. कारण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचे निधन झाले. मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाच्या बैठकीसाठी विनायक मेटे हे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. प्रवासादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर त्यांच्या कारचा चालकावरील ताबा सुटला आणि वाहन थेट एका मोठ्या ट्रकवर जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचे यात मोठे नुकसान झाले. अपघातानंतर विनायक मेटेंना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यांना तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाने मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तुकाराम बिडकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा फेब्रुवारी २०२५ मध्ये अकोला येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी टी-पॉईंटजवळ हा अपघात घडला. तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेली तीव्रता इतकी होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गीता हिंगे
गडचिरोलीच्या राजकीय क्षेत्रातील एक सक्रिय आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचे डिसेंबर २०२५ मध्ये दुर्दैवी अपघाती निधन झाले. नागपूरहून गडचिरोलीकडे येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला .गीता हिंगे यांनी गडचिरोलीच्या राजकारणात महत्वाचं योगदान दिलं होतं. त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री यांसारखी जबाबदारीची पदे यशस्वीपणे सांभाळली होती. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणावर ओळखले जात होते. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
आर. टी. (जिजा) देशमुख
मागील वर्षी, माजी विधिमंडळ सदस्य आणि भाजप नेता आर. टी. देशमुख यांचा लातूर जिल्ह्यातील टूलजापुर-लातूर रस्त्यावर रस्ता वाहन अपघातात २६ मे २०२५ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या SUV वाहनाने क्रॅश बॅरियर ओलांडून दोनदा उलटे वळण घेतले आणि गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. देशमुख हे बीड जिल्ह्याचे महत्वाचे राजकीय प्रतिनिधी होते. रस्ते अपघातात जाणाऱ्या नेत्यांची ही घटना राज्यात सामान्य नागरिकांसारखीच दुर्घटना आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या रस्ते अपघातातील मृत्यूमुळे सुरक्षिततेचा मुद्दे पुन्हा चर्चेत आला आहे.
