Download App

तुरूंगात 9 वर्ष छळ, 17 वर्षांनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता; कोण आहेत कर्नल पुरोहित?

Malegaon Bomb Blast Case मध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली. यातील कर्नल पुरोहितांवर काय आरोप होते? ते कोण आहेत? जाणून घ्या...

Acquittal Of All Accused 2008 Malegaon Bomb Blast Case who is Colonel Purohit : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Malegaon Bomb Blast Case) आज 31 जुलै 2025 रोजी निकाल जाहीर झाला आहे. 17 वर्षांनंतर न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहितांसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. मात्र यातील कर्नल पुरोहित यांचा या प्रकरणी तुरूंगात तब्बल 9 वर्ष छळ झाला आहे. त्यांच्यार या प्रकरणात काय आरोप होते? ते नेमके कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर…

मालेगावात 17 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

मालेगावमध्ये 2008 साली मशिदीजवळ उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. रमजान महिन्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी होती. या स्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी (Malegaon Bomb Blast Case) झाले. सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला आणि नंतर 2011 मध्ये तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर मुख्य आरोप ठेवण्यात आले होते. त्याशिवाय काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यात रामजी कालसंग्रा, संदीप डांगे, प्रविण तकलकी, शामजी साहू आणि राकेश धावडे यांचा समावेश आहे.

एक विधान अन् राजकारणातून पत्ता कट! साध्वी प्रज्ञा यांची राजकीय कारकीर्द कशी संपली? A टू Z स्टोरी…

यातील कर्नल पुरोहित हे या प्रकरणामध्ये 9 वर्ष तुरूंगात होते. 2017 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्यावेळी कोर्टाने म्हटलं होतं की, त्यांना राजकीय हेतूने फसवण्यात आलं आहे. कर्नल पुरोहित हे ब्राह्मण समाजाचे आहेत. त्यांचे वडिल एक बॅंक अधिकारी होते. त्यांचं शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव विद्यालयात झालं होतं. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी गरवारे कॉलेजमधून पुर्ण केलं.

हत्तीणीला नांदणी मठातून हलवण्याची शेट्टीचीच मागणी; पत्र व्हायरल होताच राजू शेट्टींचा खुलासा

तर त्यांच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर 1994 मध्ये त्यांनी मराठा लाईट इन्फेंट्री जॉईन केली. मात्र आजारी असल्याने त्यांना मिलिट्री इंटेलिजन्समध्ये शिफ्ट करण्यात आलं. 2002 ते 2005 दरम्यान त्यांना दहशतवाद विरोधी ऑपरेशनसाठी एमआय-25 इंटेलीजेन्स फिल्ड सिक्युरीटी युनिटमध्ये तैनात करण्यात आलं. त्यावेळी ते नाशिकमध्ये निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्या संपर्कात आले. त्यांच्या हिंदु्त्त्ववादी संघटना अभिनव भारतमध्ये पुरोहित सहभागी झाले होते.

कलाकारांनो सज्ज व्हा! 22 वा Third Eye आशियाई चित्रपट महोत्सव, प्रवेशिका सुरू

त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पुरोहित यांच्यावर भारतीय सैन्याचं 60 किलो आरडीएक्स चोरण्याचा आरोप होता. तसेच अभिनव भारतला फंडिंग करणे, संघटनेच्या लोकांना ट्रेनिंग देणे असे आरोप होते. तर त्यांनी चोरलेल्या सैन्याच्या आरडीएक्सपैकी एका छोट्या भागाचा वापर मालेगाव बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी करण्यात आला होता असाही आरोप त्यांच्यावर होता.

तुरूंगात तब्बल 9 वर्ष छळ

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोप करण्यात आल्यानंतर कर्नल पुरोहितांना तब्बल 9 वर्षांचा तुरूंगवास झाला होता. त्यावेळी त्यांनी कोर्टात सांगितलं होतं की, आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आलं असून तुरूंगात प्रचंड छळ करण्यात आला. मुंबई एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा हा छळ केला. यामध्ये त्यांचा उजवा घोटा मोडला होता. तसेच माझी चौकशी बेकायदेशीर रित्या करण्यात आली.

सपकाळांचा ‘नवा खेळ’ चर्चेत! नाना पटोलेंच्या जवळच्या लोकांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून डच्चू?

तसेच हे अधिकारी आपल्याला आरएसएस-विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ सदस्य, तेव्हाचे गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांचं नाव या प्रकरणात घेण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच मला 29 ऑक्टोबर 2008 ला अटक केल्यानंतरही तुरूंगात न ठेवता खंडाळ्यातील एका बंगल्यात ठेवण्यात आलं होतं. तेथे एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे आणि परमबीर सिंह यांच्यासह इतर अधिकारी चौकशी करत होते. असा दावा त्यांनी केला आहे.

follow us