Eknath Shinde On controversial leaders in Shiv Sena : शिवसेनेतील काही आमदार व मंत्र्यांच्या सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अडचणीत सापडत असल्याची चर्चा सध्या रंगात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ‘मुंबई तक’ या कार्यक्रमात झालेल्या ‘बैठक’ या विशेष मुलाखतीत मोठा खुलासा करत पक्षातील (Shiv Sena) नेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
सातत्याने गैरसमज, गोंधळ
कोण संजय? असं थेट म्हणत शिंदे यांनी संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. मी त्यांना माझ्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची असून शिस्त हेच पक्षाचं बलस्थान (Maharashtra Politics) आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. पक्षातील काही सदस्यांच्या वागणुकीमुळे सातत्याने गैरसमज, गोंधळ आणि माध्यमांत नकारात्मक चर्चा होत असल्याचं संकेत देत शिंदे म्हणाले, आपण लोकप्रतिनिधी आहोत, हे विसरू नये. सामाजिक जीवनात वावरताना पथ्य पाळणं आवश्यक आहे. मी सगळ्यांना समजावलं आहे, माझ्या शैलीत – शांतपणे, पण ठामपणे.
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणारच ; CM फडणवीसांचा स्पष्ट इशारा
शिस्तीने चालणारा पक्ष
शिंदे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सल्लाही दिला की, सावध राहा. कोणाचंही टार्गेट बनू नका. बोलताना काळजी घ्या. चुकीच्या वक्तव्यांमुळे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणं टाळा. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. शिस्तीने चालणारा पक्ष आपला आहे. आपण कसे बोलतो, कसे वागतो याकडे लोकं बघत असतात. काही गोष्टी प्रसंगानुसार घडतात. पण आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आपण सामाजिक जीवनात आहोत, आपण पथ्य पाळलंच पाहिजे. या मताचा मी आहे, असं देखील यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. काही गोष्टी झाल्या. काल-परवाच्या बैठकीत पण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. माझ्या पद्धतीत, योग्य प्रकारे समजावून सांगितलेलं आहे, असं शिंदेंनी स्पष्ट केलंय.
राज्यात प्लास्टिकच्या फुलांवर बंदी येणार? 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र; प्लास्टिक फुलांची होळी
कारवाई करावी लागेल
शिवसेना हा मालक-नोकराचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी जरी प्रमुख असलो, तरी मला सुद्धा शिस्तीतून अपेक्षा आहे. मला कुणावर कारवाई करावी लागेल अशी वेळ कोणी आणू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शेवटी योग्य वेळेस योग्य ऑपरेशन केलं जाईल, अशा शब्दांत त्यांनी भविष्यातील संभाव्य निर्णयांचीही तयारी असल्याचं सूचित केलं.
आमच्या शिवसेनेत शिस्तीला महत्त्व आहे. हा मालक नोकराचा पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी जरी प्रमुख असलो, मला समोरून पण अपेक्षा आहे. मला अशी कारवाई कुणी करायला लावू नका. सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.