Imran Khan : मोठी बातमी, अभिनेता इम्रान खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Imran Khan : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच एसआयआर रद्द करण्यासाठी देशाची राजधानी दिल्लीसह

Imran Khan

Imran Khan

Imran Khan : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच एसआयआर रद्द करण्यासाठी देशाची राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरु करण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता इम्नान खान देखील पोहचला होता. मात्र त्याला देखील मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना यांना देखील ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी अंधेरी पश्चिमेकडील डी एन नगर पोलीस ठाण्यामध्ये डिटेन केले आहे.

तर दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनात आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी 2 हजार जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपीने शनिवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलेली असूनही, या आंदोलनादरम्यान हजारो लोक जमा झाले, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली.

आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांना तैनात करण्यात आले, ज्यामुळे तो परिसर एखाद्या किल्ल्याप्रमाणे बनला आणि जंतरमंतरच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी पत्रकार, यूट्यूबर्स आणि अनेक प्रमुख नेत्यांसह 2000 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके, प्रवक्ते सौरव दास, आशुतोष रंका, ध्रुव राठी, तुषार गांधी आणि ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांनाही ताब्यात घेतले. अभिजित दीपके यांना दिल्ली पोलिसांनी थेट विमानातून उतरताच ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत सौरव दास आणि आशुतोष रंका यांनाही ताब्यात घेण्यात आले.

एकनाथ खडसेंवर 509 सारखा गुन्हा; आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप –

Exit mobile version