पुणे : राजकीय घराण्यातून एक वारसा आपण जपत असतो. मात्र, वारसा हा तुम्हाला मिळतो. पण तुम्हाला तुमचं कर्तुत्व हे सिद्ध करावंच लागते. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध असणारा व्यासपीठाचा वापर करता याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य हे निश्चितपणाने आवलंबून असते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये समारोप सत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे बोलत होत्या.
ट्विटर, फेसबुक, आणि इंस्टाग्राम पण याच्या पलीकडे प्रॅक्टिकल आणि ग्राउंड लेव्हलचा सुद्धा जग आहे. जिथे आपण जास्ती वेळ देणं गरजेचं असते. तुम्ही एखाद्या ट्विटरवर त्याच्यासोबत संवाद साधाल त्याच्या पेक्षा व ज्या वेळेला थेट संवाद साधून त्याचा फायदा हा तुमच्या वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणात होईल. कारण वन टू वन इंटरॅक्शन पेक्षा दुसरं प्रभावशाली मीडियम नाही, असे देखील अदिती तटकरे यांनी सांगितले.
अदिती तटकरे म्हणाल्या की, ग्रामसभेमध्ये कोणी गावचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही तुमचं सहभाग हा नोंदवला पाहिजे. तिथले जे तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापर्यंत तुमच्या गावातील तुमच्या वाँर्डमधले तुमच्या सबंध परिसरातील प्रश्न तुम्ही मांडले पाहिजेत. राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सक्रिय व्हायचं असेल तर या गाव पातळीवरच्या आणि तुमच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काही सभा असतील, कार्यक्रम असतील यांच्यामध्ये तुम्ही सहभागी झाले पाहिजे.