Download App

कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या महायुती सरकार विचाराधीन; अदिती तटकरे

Aditi Tatkare : महायुती सरकार येत्या काळात राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन असल्याची

  • Written By: Last Updated:

Aditi Tatkare : महायुती सरकार येत्या काळात राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना कॅन्सरवरील लस उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे ‘सजगतेतून सक्षमतेकडे’ हे ब्रीदवाक्य घेऊन एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी ही मोहीम मोफत HPV लसीकरण शिबिराच्या माध्यमातून महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे आज राबविली गेली.

कॅन्सरवरील औषधांचे लसीकरण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्यावतीने राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना महिला, युवतीचे प्रश्न सोडवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि खूप शिकायला मिळाले असा अनुभव अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितला. इतर आजारांचे दुखणे जाणवते पण कॅन्सर आजाराचे दुखणे जाणवत नाही. तिसर्‍या स्टेपमध्ये आपल्याला त्याची लक्षणे लक्षात येतात. ग्रामीण भागातील मुली व महिला यांना आजाराची काळजी याची जाणीव करून द्यावी लागते. त्यामुळे तिन्ही डोस पूर्ण घ्या. एखादा चुकवला तर या लसीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही असे आवाहनही अदिती तटकरे यांनी केले.

ग्रामीण भागातील मुली व महिलांसाठी अशाच पध्दतीने राष्ट्रवादी युवतींच्यावतीने लसीकरण उपक्रम राबवावा असे मत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले. धकाधकीच्या जीवनात खाण्याची फॅशन झाली आहे मात्र ही खाण्याची फॅशन आरोग्यासाठी बदलण्याची गरज आहे. पुढे होणारा धोका टाळावा म्हणून आताच भेसळयुक्त अन्न खाणे बंद करावे असे आवाहनही नरहरी झिरवाळ यांनी केले.

तर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला कधी सामोरं जावं लागू नये यासाठी आपणच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आहाराचे पथ्य पाळले तर नवी पिढीला आयुष्य चांगले जगता येईल असे स्पष्ट मत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडले. या लसीकरण मोहिमेसोबत कर्करोगविषयी जनजागृती, तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला शिबिर, तसेच लसीकरणासंदर्भातील सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली. या लसीकरणाची सुरुवात मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेदार यांनी लस घेऊन केली.

मोठी बातमी, भारतावर 50 टक्के टॅरिफ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा 

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, रुपालीताई ठोंबरे, मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेदार, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे आदींसह मोठया प्रमाणात युवती आणि जेजे हॉस्पिटलचा डॉक्टर आणि नर्स स्टाफ उपस्थित होता.

follow us