मोठी बातमी, भारतावर 50 टक्के टॅरिफ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump On India Tariff : भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ (India Tariff) लावण्याची घोषणा केली होती तर आता त्यांनी भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारीच सांगितले होते की मी पुढील 24 तासांत भारतावरील टॅरिफ वाढवणार आहे.
ट्रम्पची इच्छा आहे की भारताने रशियाकडून (Russia) तेल खरेदी करू नये. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी तणाव दिसून येत आहे. यापूर्वी देखील अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करण्याचा आरोप करत 24 तासांच्या आता भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर आता ट्रम्प यांनी भारतावर 25 अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला आहे.
तर दुसरीकडे आता भारताकडून देखील अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन स्वतः रशियासोबत व्यवसाय करत आहेत आणि ते भारताला असे करण्यापासून कसे रोखू शकतात. असं भारतीय परराष्ट्र मंत्रायलाये म्हटले आहे.
यश दयायला धक्का, ‘त्या’ प्रकरणात अटकेला स्थगिती नाहीच; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
तसेच 2022 मध्ये युक्रेन युद्धादरम्यान जेव्हा भारताने रशियासोबत तेल व्यापार सुरू केला तेव्हा अमेरिकेनेच त्याला प्रोत्साहन दिले. देशातील नागरिकांचे हित आणि सुरक्षा सर्वोपरि आहे, सरकार त्याच्या मूल्यांशी तडजोड करणार नाही.असं देखील भारतीय परराष्ट्र मंत्रायलायने म्हटले आहे.
YRF ची घोषणा: ‘वॉर 2’ मध्ये हृतिक रोशन आणि एनटीआर यांचा जबरदस्त डान्स-ऑफ पण फक्त मोठ्या पडद्यावरच!