यश दयायला धक्का, ‘त्या’ प्रकरणात अटकेला स्थगिती नाहीच; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

यश दयायला धक्का, ‘त्या’ प्रकरणात अटकेला स्थगिती नाहीच; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ysah Dayal : आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) गेल्या काही दिवसांपासून खाजगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. जयपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तर आता या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) यश दयालच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यश दयालच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पीडिता अल्पवयीन असल्याने या प्रकरणात अटक आणि पोलीस (Police) कारवाई थांबवता येणार नसल्याचे राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच या प्रकरणात न्यायालयाने केस डायरी देखील मागवली आहे आणि पुढील सुनावणी 22 ऑगस्ट 2025 रोजी ठेवली आहे. तर दुसरीकडे यश दयालविरुद्ध काही दिवसांपूर्वी गाझियाबादमधील एका महिलेने देखील बलात्काराचा आरोप केला होता.

यश दयालसाठी मोठा धक्का

या प्रकरणात जयपूरमधील सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय मुलीने यश दयालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यश दयालने 2023 मध्ये क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचे आश्वासन देऊन 2 वर्षे भावनिक आणि शारीरिक शोषण केला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तर दुसरीकडे यश दयालचे वकील कुणाल जयमन यांनी सांगितले की, गाझियाबादमध्ये एका मुलीने आमच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल केला होता ज्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण हा खटला अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने या प्रकरणात दिलासा देता येणार नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होईल तोपर्यंत केस डायरी न्यायालयात सादर करावी लागेल.

YRF ची घोषणा: ‘वॉर 2’ मध्ये हृतिक रोशन आणि एनटीआर यांचा जबरदस्त डान्स-ऑफ पण फक्त मोठ्या पडद्यावरच! 

गाझियाबादमध्ये बलात्काराचा आरोप

जुलै 2025 मध्ये लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पाच वर्षे शारीरिक आणि भावनिक शोषण केल्याचा आरोप गाझियाबादमधील एका महिलेने यश दयालविरुद्ध केला होता. या प्रकरणात यशने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने 15 जुलै 2025 रोजी त्याच्या अटकेला स्थगिती दिली होती. एखादी व्यक्ती पाच वर्षांपर्यंत कोणालाही मूर्ख बनवू शकत नाही असं म्हणत न्यायालयाने यश दयालला दिलासा दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube