मोठी बातमी, आरसीबी खेळाडू यश दयालविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

मोठी बातमी, आरसीबी खेळाडू यश दयालविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

Yash Dayal : वेगवान गोलंदाज यश दयालविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून यश दयालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी होती. तर आता यश दयालविरुद्ध (Yash Dayal) इंदिरापुरम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

यश दयाल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजरकडून (RCB) खेळत आहे. इंदिरापुरम (Indirapuram) परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित मुलीने लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी आयजीआरएस पोर्टलवर या प्रकरणाची तक्रार केली होती. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली होती. तर आता या प्रकरणात आज गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तपास सुरु असून तपासानंतर समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडितेने तिच्या इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवरील यश दयालसोबतच्या चॅट्सही पोलिसांना दिल्या आहे. यासोबतच, पीडितेने पोलिसांना इतर पुरावेही दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यश दयालचे इतर मुलींशीही संबंध होते आणि त्यांनी तिची फसवणूक केली असा पीडितेचा आरोप आहे.

GDP मध्ये 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा; खासदार दुबेंवर सुधीर मुनगटीवार भडकले

तर दुसरीकडे पीडित मुलीच्या तक्रारीवरून क्रिकेटपटू यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. असं निमिश पाटील, डीसीपी ट्रान्स हिंडन यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube