हातात फटाके फोडले, रस्ता अडविला ! एफसी रोडवर गोंधळ घालणाऱ्या चाळीस जणांविरुद्ध गुन्हा

  • Written By: Published:
हातात फटाके फोडले, रस्ता अडविला ! एफसी रोडवर गोंधळ घालणाऱ्या चाळीस जणांविरुद्ध गुन्हा

FIR filed against 40 people for creating chaos on FC Road : आरसीबी (RCB) संघाने तब्बल 17 वर्षानंतर आयपीएलचे विजेतेपद मिळाल्यानंतर या संघाचे चाहते हे बेभान झाले होते. देशभर विराट कोहली व आरसीबीचे चाहते विजयोत्सव साजरा करत होते. हा विजयोत्सव साजरा करताना चाहत्यांना मात्र भान उरले नव्हती. त्यामुळे बेंगळुरूतील स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकाचा जीव गेला. इकडे पुण्यातही कुठलेही नियम न पाळता विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे. आता अतिउत्साह चाहत्यांवर पोलिसांनी कायद्याचे हत्यार उगारले आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर गोंधळ घालणाऱ्या (FIR) चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात (Pune) जल्लोष करताना हातात फटाके फोडले, गाड्यांचे मोठ्याने हॉर्न वाजविले, विराटचे फोटो मिरवण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस सरकारसोबत! अखेर सुप्रिया सुळेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणून ‘त्या’ निवेदनावर सही नाही

आयपीएलमध्ये 17 वर्षानंतर आरसीबी संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. एफसी रोडवर मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक एकत्र जमले होते. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले. काही तरुणांकडून रस्त्यावर उभे राहून हुल्लडबाजी करत नागरिकांना त्रास देण्यात आला. रस्ता अडवून वाहनचालकांना अडथळा निर्माण करण्यात आला. यावेळी काही तरुणांकडून असभ्यवर्तन देखील करण्यात आले. आता याच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या चाळीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने तरुण हे आयपीएलची फायनल संपल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी गुडलक चौकात जमले होते. तरुणांनी नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होईल या पद्धतीने फटाके फोडले. तसेच सार्वजनिक ठिकाणावर येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांकडूनच डेक्कन पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भरधाव ट्रकची धडक! तेजस्वी यादव यांचा भीषण अपघात, 3 सुरक्षा कर्मचारी जखमी

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना शोधणार
या कारवाईबाबत पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, जल्लोष करण्यासाठी, रॅली काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु कुठेलीही परवानगी न घेता एफसी रोडवर जल्लोष करण्यात आला. पण हा जल्लोषाला कुठेही मर्यादा नव्हती. बेभान होऊन हा जल्लोष करण्यात आला होता. त्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास झाला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना निष्पण करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube