GDP मध्ये 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा; खासदार दुबेंवर सुधीर मुनगटीवार भडकले

GDP मध्ये 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा; खासदार दुबेंवर सुधीर मुनगटीवार भडकले

Sudhir Mungantiwar On Nishikant Dubey : राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे बंधू हिंदी सक्तीचा विरोध करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची तुलना पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी करत आहे तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत. मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? असं म्हणत नवीन वादाची सुरुवात केली आहे.

खासदार निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चारही बाजूने भाजपवर टीका करताना दिसत आहे. तर आता या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खासदार निशिकांत दुबे यांना सुनावले आहे.  महाराष्ट्राबद्दल असं बोलणे चुकीचे आहे. असं माध्यमांशी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, खासदार निशिकांत दुबे यांचा मनसेबद्दल राग असेल तर त्यांनी  असा वक्तव्य करु नये. तसेच आशिष शेलार यांनी देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करु नये. महाराष्ट्राबद्दल असा वक्तव्य करणे चुकीचा आहे. तुमचा राग एका पक्षाबद्दल असेल पण त्यासाठी मराठी माणसाबद्दल असं बोलू शकत नाही. आज 15 टक्के वाटा जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा आहे. असा टोला देखील माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार निशिकांत दुबे यांना लावला.

जय शाह नंतर आयसीसीमध्ये आणखी एका भारतीयाची एन्ट्री, मिळाली मोठी जबाबदारी 

तर संघ आणि भाजपची भूमिका मराठी संदर्भात एकच आहे.  जब तक सुरज चांद रहेगा आणि त्यानंतर सुद्धा मराठी भाषा राहणार. महाराष्ट्राचा प्रश्न हिंदीबद्दल होता मराठी बद्दल नाही. आपले राजकीय नेते इंग्रजीला अलिंगन देतात आणि हिंदीला हम आपके कोन म्हणतात? असं देखील माध्यमांशी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube