जय शाह नंतर आयसीसीमध्ये आणखी एका भारतीयाची एन्ट्री, मिळाली मोठी जबाबदारी

जय शाह नंतर आयसीसीमध्ये आणखी एका भारतीयाची एन्ट्री, मिळाली मोठी जबाबदारी

Sanjog Gupta : आयसीसीमध्ये (ICC) जय शाह यांच्यानंतर आता आणखी एका भारतीयाची एन्ट्री झाली आहे. भारतीय मीडिया संजोग गुप्ता यांची आयसीसीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह (Jay Shah) यांच्या अध्यक्षेखालील आयसीसी बोर्डाने या नियुक्तीला मान्यता दिली आहे. संजोग गुप्ता (Sanjog Gupta) जिओस्टारमध्ये सीईओ क्रीडा या पदावर काम करत होते.

जेफ अ‍ॅलार्डाईसची जागा घेणार

संजोग गुप्ता हे ऑस्ट्रेलियाचे जेफ अ‍ॅलार्डाईस यांची जागा घेणार आहे. जेफ अ‍ॅलार्डाईस या वर्षाच्या सुरुवातीला वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अ‍ॅलार्डाईस यांनी जवळजवळ चार वर्षे आयसीसीचे सीईओ म्हणून काम केले होते. गुप्ता हे आयसीसीचे सातवे सीईओ होणार आहे. या पदासाठी जगभरातील 25 देशांमधून 2500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 12 नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती, ज्यात क्रीडा प्रशासन आणि कॉर्पोरेट जगतातील दिग्गजांचा समावेश होता. ही नावे आयसीसीच्या नामांकन समितीकडे पाठवण्यात आली होती.

नामांकन समितीमध्ये आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) चे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन, श्रीलंका क्रिकेट (SLC) चे प्रमुख शम्मी सिल्वा आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचा समावेश होता. या सर्वांनी संजोग गुप्ताची शिफारस केली, ज्याला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मान्यता दिली.

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारतात आणि जागतिक स्तरावर क्रीडा प्रसारणाच्या परिवर्तनामागे संजोग गुप्ता एक प्रेरक शक्ती आहेत.” त्यांनी प्रो कबड्डी लीग, इंडियन सुपर लीग (फुटबॉल) सारख्या लीगची स्थापना करण्यात आणि भारतात विम्बल्डन आणि प्रीमियर लीग सारख्या जागतिक स्पर्धा लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

OYO Hotel मध्ये एका तासासाठी भाड्याने रुम, भाजप आमदार मुनगंटीवारांचा गंभीर आरोप

तर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “संजोग यांना क्रीडा धोरण आणि व्यापारीकरणाचा व्यापक अनुभव आहे, जो आयसीसीला पुढे नेण्यात अमूल्य ठरेल.” शहा म्हणाले की गुप्ता यांचे मीडिया जगतातील दृष्टिकोन आणि समज जागतिक स्तरावर आयसीसीला फायदेशीर ठरेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube