धक्कादायक! दोन इंटर्नशिपसाठी आले 1200 अर्ज; नामांकित कंपनीच्या सीईओंनी दिला मोठ्या संकटाचा इशारा

धक्कादायक! दोन इंटर्नशिपसाठी आले 1200 अर्ज; नामांकित कंपनीच्या सीईओंनी दिला मोठ्या संकटाचा इशारा

1200 applications for two internships CEO warned a big crisis : कित्येकदा सरकारी नोकरीच्या भरतीसाठी अत्यंत कमी जागा असतानाही शेकडो अर्ज आल्याचं आपण ऐकलं आहे. किंवा क्लर्कच्या जागेसाठी इंजिनियर उमेदवाराने अर्ज केल्याचेही आपण नेहमी ऐकतो. मात्र नुकताच एका खाजगी नामांकित कंपनीमध्ये केवळ दोन इंटर्नशिपच्या जागांसाठी तब्बल बाराशे अर्ज केले गेले. तसेच त्यातील केवळ 20 अर्ज हे त्या पोस्टसाठी पात्र ठरले. त्यानंतर या कंपनीच्या सीईओंनी चिंता व्यक्त करत मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून सविस्तर…

मोठी बातमी! राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नुकताच अनमॅन्ड डायनामिक्स या कंपनीचे सीईओ आणि चीप साइंटीस्ट श्रीनाथ मल्लिकार्जुन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करून सांगितलं की, त्यांच्या कंपनीमध्ये दोन इंटर्नशिपच्या जागांसाठी तब्बल बाराशे अर्ज करण्यात आले. तसेच त्यातील केवळ 20 अर्ज हे पात्र ठरले आहे. यावरून त्यांनी वाढती लोकसंख्या त्याचबरोबर भारतीय शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच जे ग्रॅज्युएट्स कॉल सेंटर किंवा क्लर्क यासारख्या नोकऱ्यांसाठी सध्या पात्र ठरत आहेत. त्यांची जागा देखील लवकरच एआय घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सारख्या स्वयंअध्ययन आणि स्वतंत्र प्रोजेक्टवर काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

शिर्के खरचं गद्दार होते? इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले होते?

तर दुसरीकडे आपण अनेकदा म्हणतो की, नोकरी करण्यापेक्षा स्वतःचं छोटं का होईना स्टार्टअप सुरू करावं. मात्र या गैरसमजला देखील मल्लिकार्जुन यांनी फटकारल आहे. ते म्हणतात की, गुंतवणुकदारांकडे देखील दूरदृष्टी नाहीय. पुढे त्यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगाराच्या संधी मात्र कमी पडत आहे तसेच भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कमतरता असल्याने हे संकट आणखी वाढत आहे असंही म्हटलं.

पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी…” गीताला जाहीर

यामध्ये मल्लिकार्जुन यांनी भारतीय शिक्षण पद्धतीमधील पाच प्रमुख समस्या सांगितल्या ज्यामध्ये अनेक आयआयटीचे विद्यार्थी जेईई ही परीक्षा पास झाल्यानंतर शिक्षण सोडून देतात. त्यामुळे ते त्यांच्या योग्य नोकरीसाठी तयार होत नाहीत. दुसरं महाविद्यालय आणि विद्यापीठ हे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यात यशस्वी होत आहेत. तिसरं म्हणजे पहिल्या पिढीचे पदवीधर हे बहुतेकता वास्तविक ज्ञान न मिळवताच पदवी मिळवतात. तर चौथं कारण म्हणजे जुना अभ्यासक्रम, अप्रभावी परीक्षा, खराब प्रशिक्षक या सर्वांमुळे ही व्यवस्था आणखी बिघडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे लक्षातच येत नाही की त्यांना भरकटवलं जात आहे. त्यामुळे लाखो पदवीधर हे केवळ कॉल सेंटर आणि लिपिक पदाच्या नोकरीसाठीच पात्र ठरतात. ज्या नोकऱ्या काही दिवसातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नष्ट होतील.

त्यामुळे मलिकार्जुन यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. त्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पुस्तकं अभ्यासली पाहिजे, एनपीटीईएल सारख्या ऑनलाइन अभ्यासक्रमाचा वापर करून स्वतंत्र प्रोजेक्टवर काम करत स्वतःची व्यवहारिक कौशल्य विकसित करण्यावर जोर दिला पाहिजे. जेणेकरून ते जॉब मार्केटमध्ये टिकू शकतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube