मोठी बातमी! राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • Written By: Published:
मोठी बातमी! राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Transfer) बदल्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  राजेंद्र निंबाळकर (Rajendra Nimbalkar) , संजय यादव (Sanjay Yadav), डॉ. राजेंद्र भारुड (Dr. Rajendra Bharud) , दीपक कुमार मीना (Deepak Kumar Meena), समीर कुर्तकोटी (Sameer Kurtakoti) , महेश आव्हाड (Mahesh Awhad) आणि कीर्ती किरण पुजार (Kirti Kiran Pujar) या अधिकाऱ्यांचे बदल्या करण्यात आल्या आहे.

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, राजेंद्र निंबाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई येथे कार्यरत होते. तर संजय यादव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर दीपक कुमार मीना, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समीर कुर्तकोटी यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई यांना महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी…” गीताला जाहीर

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 17 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर गेल्या दोन महिन्यात 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढले आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

1) राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2) संजय यादव (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3) डॉ. राजेंद्र भारुड (IAS:RR:2013) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4) दीपक कुमार मीना (IAS:RR:2013) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5)समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6) महेश आव्हाड (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7) कीर्ती किरण पुजार (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube