ICC च्या अध्यक्षपदाची धूरा जय शाहांच्या हाती, पदभार स्वीकारताच काय म्हणाले?
ICC Chairman :भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council) अध्यक्ष म्हणून नवीन पदभार स्वीकारला. तीनच महिन्यांपूर्वीच त्यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण, त्यांनी 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला.
35 वर्षीय जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत. तसेच आयसीसीचे प्रमुखपद भूषवणारे ते पाचवे भारतीय ठरले आहेत. 27 ऑगस्ट रोजी झालेल्या आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. आता त्यांनी बीसीसीआयचे सचिवपद सोडून आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांना 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव बनवण्यात आले होते.
A new chapter of global cricket begins today with Jay Shah starting his tenure as ICC Chair.
Details: https://t.co/y8RKJEvXvl pic.twitter.com/Fse4qrRS7a
— ICC (@ICC) December 1, 2024
आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जय शाह यांनी आपल्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये कशाला प्राधान्य असेल हे सांगितलं. ते म्हणाले, ‘आयसीसीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणे सन्मानाचे आहे. ICC संचालक आणि सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपण 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी करत असल्याने हा कालावधी आपल्या खेळासाठी महत्वाचा आहे. जगभरातील चाहत्यांसाठी क्रिकेट अधिक सर्वसमावेशक आणि आकर्षक बनवण्यासाठी काम करायचं असल्याचं शाह म्हणाले.
पुढं ते म्हणाले, महिलांच्या क्रिकेट विकासालाही गती देण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याची क्रिकेटमध्ये अफाट क्षमता आहे. मी आयसीसी टीम्स आणि त्याच्या सदस्य संघांसोबत जवळून काम करण्यासाठी आणि या संधीचा फायदा घेत या खेळाला आणखी नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहे.
दरम्यान, जय शाहा यांना क्रिकेट प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. 2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून त्यांनी क्रिकेट प्रशासनातील प्रवास सुरू केला.
यानंतर त्यांनी 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. बीसीसीआयचे सचिव म्हणून त्यांनी 6 वर्षे काम केले आहे. ते बीसीसीआयचे सर्वात तरुण सचिव ठरले होते. याशिवाय, ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही राहिलेले आहेत.