Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. याला आता महिना उलटून गेला आहे. तरीही या प्रकरणातला (Devendra Fadnavis ) एक आरोपी अद्यापही फरार आह. तसंच, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ज्याच्यावर होत आहे, त्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात? जरांगे पाटलांना संशय
हा वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने, विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. आता या प्रकरणावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रथमच, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखत आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांना कोण अडवत आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावर अदित्य ठाकरे म्हणाले, ‘त्यांना राजीनामा देण्यापासून तसेच मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्यापासून कोण अडवत आहे? मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का? की काही वेगळा युतीधर्म आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.