वाराणसीमध्ये अनेक मंदिरे तुम्ही कॉरिडॉरच्या (Ram Mandir) नावाखाली सपाट केली आहेत. काल काली मातेचे मंदिर त्यांनी युपीमध्ये पाडले. मुंबईतही मुंबा देवीच्या परिसरात कॉरिडॉरच्या नावाने भाजप जमिनी हिरावून घेऊ इच्छिते, त्याच्या विरोधातही आम्ही लढू असा थेट हल्लाबोल शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
पुढ बोलताना ते म्हणाले, खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपावालेच आहेत. जर हिम्मत असेल तर पहिले जाऊन अयोध्येमध्ये भाजपने मंदिराला का लुटलं याच्यावर प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवा. राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बनले, भाजपने ना शासन केलं ना कायदा आणला, पण भाजप क्रेडिट घेऊ इच्छिते असा घणाघातरी त्यांनी केला.
राम मंदिरातील चोरीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या वक्तव्याने नवा वाद, ट्रोलरला दिलं हे उत्तर
आदित्य ठाकरे म्हणाले की, सीबीआय, आयटी हे भाजपचे पोपट आहेत. इडीला चंपत राय दिसत नाहीत, इडीला आता शेखर सुमन दिसतील. त्यांनी प्रश्न विचारला की सीबीआय चंपतराय किंवा मिश्रा यांच्या घरी का जात नाही आणि या सर्वांत भाजप व पंतप्रधान महोदयांची भूमिका काय आहे? त्याचबरोबर भाजप नेत्यांनी आमिर खानला लक्ष्य केल्यावर ठाकरे म्हणाले की, आमिर खानचे फोटो तर मोदी साहेबांसोबत आहेत, त्यांची चांगली मैत्री आहे. उज्जैनमध्ये ‘लँड जिहाद’ कोणी केला तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
उज्जैनच्या पावन भूमीला कोणी लुटले? तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लुटले. आधीची भाजप जी अडवाणी, वाजपेयी साहेबांची, मुंडे काका-महाजन काकांची होती ती बदलली आहे. सध्याचे भाजपचे प्रमुख चेहरे हे मिक्सिंग वाले, इथेनॉल मिक्सिंग वाले चेहरे आहेत. देशाच्या जीवाला धोका असणाऱ्या “भेसळ”सारख्या विषयावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
