मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यप्रणालीबद्दल हरकत घेतल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी सरकारकडून राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.
अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणाने झाली. यावेळी रमेश बैस यांनी 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा अभिभाषणात केली आहे. यावेळी राज्यपाल बैस यांनी ज्या मुद्द्यांवर भाष्य केलंय ते मागील मुद्देच असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय.
अभिनेता सुबोध भावेकडून मराठी राजभाषा दिनाच्या खास शुभेच्छा
तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुढे नेलेल्या कामांवरच राज्यपालांनी भाष्य केलं आहे. राज्यपालांचं भाषण सुरु असताना सत्ताधारी जे बसलेत, त्यांना बाकांवर थापवावं की नाही हा प्रश्न पडलेला होता.
राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांमध्ये उत्साह कमी दिसून येत होता. राज्यपालांची कुठंतरी दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच सभागृहाच्या पटलावर राज्यपालांनी व्यवस्थित माहिती माहिती द्यावी. यासंदर्भातील जबाबदारी आम्ही घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात ! चूक झाल्याचं सांगत म्हणाले…
दरम्यान, राज्यपाल रमेश बैस नवीनच राज्यपाल पदावर आले असून त्यांच्यावर आम्ही आत्ताच भाष्य करणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.