अभिनेता सुबोध भावेकडून मराठी राजभाषा दिनाच्या खास शुभेच्छा
मुंबई : कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज (Kusumagraj)यांचा आज जन्मदिवस. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din)म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं. आज राजकीय(Political), सामाजिक(Social), मनोरंजन (Entertainment)क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी मराठी चित्रपट सृष्टीचे अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या लेट्सअप मराठीच्या (LetsUpp Marathi) माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी अभिनेते सुबोध भावे म्हणाले की, तुम्हाला सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्रात राहणाऱ्या, महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी अमराठी सर्वदूर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सर्वांना माझ्याकडून सस्नेह नमस्कार आणि प्रेम. खरं म्हणजे आज कवी कुसुमाग्रजांची जयंती आणि म्हणूनच आजचा दिवस आपण मराठी राज भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी साहित्यात कितीतरी जणांचं योगदान आहे. पण आज कुसुमाग्रजांची आठवण आहे म्हणून त्याच्या ‘कणा’ या कवितेबद्दल सांगेल.
मराठी भाषा दिन : अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो कसा मिळतो ?
कविता तर त्यांच्या अनेक आहेत पण कणा ही कविता माझ्यासाठी यासाठी महत्त्वाची आहे की, तुम्ही आपल्याला शाळेत असताना शिकायला होती. आता त्याचं महत्त्व कळतं की, आपण थोडं मोठं होतो, आणि सगळ्या प्रकारची संकटं आपल्यावर येत असतात, आपण खचूनसुद्धा जाऊ शकतो, या संकटांनी. अशा वेळेस कोणीतरी एकजण ज्यांना आपण मानतो, ज्या व्यक्तीचे दोन कौतुकाचे शब्दसुद्धा आपल्या मरगळलेल्या मनाला उभारी देण्यासाठी महत्वाचे ठरतात. एखाद्या व्यक्तीनं पाठीवर हात ठेवून तू फक्त लढ एवढं म्हणणं पुरेसं असतं.
मला असं वाटतं की, या सगळ्या भाव-भावना कुसुमाग्रजांनी अत्यंत छोट्याशा कणा नावाच्या कवितेतून मांडल्या आहेत. ती कविता मला जेव्हा आत्यंतिक अस्वस्थ वाटतं, मला आत्मविश्वास कमी वाचतो तेव्हा-तेव्हा मी ती कविता वाचतो. तेव्हा कुठेतरी प्रत्यक्ष कुसुमाग्रजच माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त लढ. तर असं एकदम भारावून गेल्यासारखं होतं. एक नविन उर्जा मिळते आणि मी माझ्या कामाला नव्या विश्वासानं सुरुवात करतो.
तेव्हा तुम्हीही मराठी साहित्यावर प्रेम करत असाल, मराठी वाचत असाल, मराठी बोलत असाल तर महाराष्ट्रात आवर्जून मराठी बोला. आपली भाषा बोलण्यात कोणताही कमीपणा नाही. जिथे जाल तिथं मराठी बोला. ज्यांना मराठी येत नसेल त्यांना शिकवा. आपणच आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपणच आपल्या भाषेचा गौरव केला पाहिजे. पुन्हा एकदा मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा, जय हिंद जय महाराष्ट्र अशा पद्धतीनं अभिनेते शुभेच्छा दिल्या आहेत.