दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र पण ‘तो’ पर्यंत सुनावणी सुरुच राहणार…, अ‍ॅड. असीम सरोदे असं का म्हणाले?

Asim Sarode On Supreme Court : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Asim Sarode On Supreme Court

Asim Sarode On Supreme Court

Asim Sarode On Supreme Court : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजपासून या प्रकरणात सुनावणी होणार आहे. जर आज सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही तर 22 जानेवारी रोजी देखील सुनावणी होणार असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आज सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेनेचे नाव निवडणूक चिन्हाशी संबंधित याचिकेवर सुनावणी होणार आहे.

जर या प्रकरणात एकाच वेळी सुनावणी पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशीसुद्धा या प्रकरणात सुनावणी होणार असून 22 जानेवारीला कोणतेही महत्त्वाचे प्रकरण सूचिबद्ध करु नये असे निर्देश सरन्यायाधीश सूर्य कांत (Chief Justice Surya Kant) यांनी मागच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांना दिले होते. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटांना अंतिम युक्तिवाद करण्यासाठी प्रत्येकी तीन-तीन तासांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणात आता लवकरच महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणावर अ‍ॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी भाष्य करत राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच असं म्हटलं आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालायने आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु करू असे मागच्या तारखेला सांगून ठेवले होते. अगदी कुणी किती वेळ युक्तिवाद करणार हे सुद्धा सांगितले होते. आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. (जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच).

परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगांबाबत 100 मीटर उंचीच्या पेक्षा जास्त असतील त्यांनाच डोंगर मानणार असा अहवाल सरकारतर्फे कोर्टात दाखल झाला व त्याला तत्कालीन चीफ जस्टीस भूषण गवई साहेब यांनी मान्यता दिली.

शरद पवारांसह ‘नगर’ मध्ये निलेश लंके यांची जादू संपली? राजकारणातील प्रवास अवघड

तो निर्णय पर्यावरण विरोधी असल्याबाबत केसेस वर आज तातडीची सुनावणी दुपारी एक वाजता होणार आहे. त्यामुळे “शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह” याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही.

Exit mobile version