Download App

Letsupp Special : 30 वर्षांनंतर ‘जालना’ पुन्हा ठरणार OBC आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू

जालना : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन सुरु करणार आहोत, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. येत्या 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा घेत याची सुरुवात होणार आहे, अशी घोषणा ओबीसी नेते आणि भाजपचे (BJP) माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी केली. मुंबईत (Mumbai) ओबीसी समाजातील नेत्यांनी आज (7 नोव्हेंबर) मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानंतर प्रकाश शेंडगे माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, त्यांच्या या घोषणेमुळे तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू जालना जिल्हा असणार आहे. (After 30 years Jalna district will once again be the focal point of the agitation for OBC reservation)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे दुकान उघडले आहे, अशी भूमिका घेत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. मागच्या दारातून ओबीसीमध्ये येण्याचा हा कार्यक्रम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण वेगळं आरक्षण द्या, आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे. त्यांच्या याच भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वात एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. सभा, आंदोलन, मोर्चा यासाठी तयारी सुरु केली आहे.

Sanjay Raut : ‘मुश्रीफ, अजितदादा अन् भुजबळ ‘महादेव अ‍ॅप’ मेंबर’; राऊतांचा गंभीर आरोप

17 नोव्हेंबरपासून ओबीसींचा एल्गार

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी शेंडगे यांनी केली. ते म्हणाले, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा घेत याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर राज्यभर आंदोलन होणार आहे. ओबीसींमध्ये सरकारला खाली खेचण्याची ताकद आहे. ओबीसींची ताकद मतपेटींमधून दिसेल. आम्ही न्यायालयीन लढाईसाठीही तयार आहोत. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण ते ओबीसीतून नको. मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षण द्यावं, अशी भूमिकाही शेंडगे यांनी जाहीर केली.

30 वर्षांनंतर जालना पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा केंद्रबिंदू :

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या समता परिषदेचा 6 जून 1993 साली पहिला मेळावा जालन्यामध्ये पार पडला होता. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये हा मेळावा झाला होता. यात प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे तत्कालीन समाजकल्याण मंत्री सिताराम केसरी, महाराष्ट्रातील तत्कालीन समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, मंत्री शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड उपस्थित होते. या सर्वांशिवाय देशातील विविध मान्यवरांसह सुमारे 2 लाखांहून जास्त त्या मेळाव्यात सदस्य उपस्थित होते. याच मेळाव्यात मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करण्यात आला होता.

तब्बल 32 वर्ष लढला अन् विजयाचा गुलाल उधळला; अरणगावात लंकेंचा विखे-कर्डिलेंना धक्का!

याच मागणीनुसार 1994 साली शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला होता. आता 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा जालना ओबीसी आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा यावेळी शेंडगे यांनी केली. ते म्हणाले, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी मेळावा घेत याची सुरुवात होणार आहे, अशी घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

Tags

follow us