गुगलचं सर्वात मोठं ऑफिस हैदराबादमध्ये; 18 हजार युवकांचं काम गेलं, रोहित पवारांची टीका

पुणे : इंटरनेट जगतातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगल (Google) त्यांचे दुसरे सर्वात मोठे ऑफिस हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारत आहे. तब्बल 30 लाख स्केअर फुटचे हे ऑफिस गुगलच्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ‘माउंटन व्ह्यू’ मुख्यालयानंतर हे दुसरे सर्वात मोठे असणार आहे. या ऑफिसचे बांधकाम सध्या सुरु असून यामुळे जवळपास 18 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .गुगल […]

Google. Rohit Pawar

Google. Rohit Pawar

पुणे : इंटरनेट जगतातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगल (Google) त्यांचे दुसरे सर्वात मोठे ऑफिस हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारत आहे. तब्बल 30 लाख स्केअर फुटचे हे ऑफिस गुगलच्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ‘माउंटन व्ह्यू’ मुख्यालयानंतर हे दुसरे सर्वात मोठे असणार आहे. या ऑफिसचे बांधकाम सध्या सुरु असून यामुळे जवळपास 18 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .गुगल इंडियाचे मुख्यालय आधीपासून हैदराबादमध्ये आहे. (After announcement of Google’s biggest office in Hyderabad, Rohit Pawar criticizes Shinde government)

दरम्यान, याच बातमीनंतर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी #गोंधळलेले_निकामी_सरकार असं म्हणत राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. आमदार पवार म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून मुंबई व महाराष्ट्राची ओळख असतानाही इंटरनेट जगतात क्रांती घडवणारी बलाढ्य कंपनी Google हैद्राबादमध्ये तब्बल 30 लाख स्क्वेअर फिटचे नवीन ऑफिस बनवत आहे.

इथे 18000 युवांना काम मिळणार आहे. हेच ऑफिस मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात सुरू झालं असतं तर ती मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली असती तसंच राज्यातील युवांना रोजगारही मिळाला असता, मात्र अभिमान तर सोडाच सध्याच्या सरकारला राज्यातील बेरोजगार युवांचंही काहीही पडलेलं नाही, अशीही टीका रोहित पवार यांनी केली.

आनंद महिंद्रा यांचे ट्विटही चर्चेत :

गुगलच्या या बातमीनंतर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून भौगोलिक राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची घोषणा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, मी गुगलची ही घोषणा हळूहळू वाचली जेणेकरून ती माझ्या मनात स्थिर होईल.

जेव्हा गुगलसारखी जागतिक, प्रतिष्ठित कंपनी अमेरिकेबाहेरील देशात आपले सर्वात मोठे ऑफिस बांधण्याचे ठरवते, तेव्हा ती केवळ व्यावसायिक बातमी नसते, तर ते भौगेलिक राजकीय विधान असते. ते आता सर्वकाही इथे घडत आहे, असेही आनंद महिंद्रा म्हणाले.

Exit mobile version