Aurangzeb Photo Controversy in latur : राज्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा वाद काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. कोल्हापूर आणि अहमदनगरनंतर आता लातूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाचा शिवप्रेमींनी निषेध नोंदवला आहे. हे प्रकरण लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावचे आहे. औरंगजेबचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लातूरच्या किल्लारी गावात एका व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये औरंगजेबच्या फोटोचे स्टेटस पोस्ट केले होते. शिवप्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी विरोध केला. त्याचवेळी भावना दुखावल्याचा मुद्दा मांडत 15 जून रोजी निषेध नोंदवत परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवली होती.
फक्त नेहरु मेमोरियलच नाही तर मोदींच्या काळात यांचीही नावे बदलली; वाचा यादी
यापूर्वी कोल्हापूर आणि अहमदनगर शहरात औरंगजेबचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याचे कौतुक करण्यात आले. शिवप्रेमींना याची माहिती मिळताच निदर्शने करण्यात आली होती. आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जमावाने दगडफेक केली होती. यानंतर पोलिसांनाही कारवाई करावी लागली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. याप्रकरणी आतापर्यंत 40 तरुणांना अटक करण्यात आली आहे.
सामाजिक सलोखा राखण्यासाठी काही लोकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. औरंगजेबाचा फोटो कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये शेअर केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचा इशारा दिला होता.