“माझे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र, आता देशात जाण्याकडे लक्ष” : संभाजीराजेंची कोल्हापूरच्या आखाड्यातून माघार?

कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी […]

Vishalgarth Encroachment वरून मुश्रीफ, सतेज पाटील, जलीलांवर संभाजीराजे आक्रमक

Sambhajiraje Chhatrapati

कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संभाजीराजे यांनी श्रीअंबाबाई मंदितात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर ते म्हणाले,  मी आज काही वेगळे मागितले आहे असे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज या नात्याने शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करण्यासाठी बळ मागितले. आज वाढदिवस आहे आणि मला असं वाटते की चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टी बोलावे. (After nine days of anonymity, SambhajiRaje Chhatrapati appeared before everyone on his birthday. At that time he interacted with the media.)

Lok Sabha Elections : “दानवेंनी गद्दारी केल्याने लोकसभेत पराभव”; ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट

आज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकवरुन गाड्या आल्या आहेत. यातील काही गाड्यांवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते ते म्हणाले, माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे. दरम्यान, नऊ दिवसांच्या अज्ञातवासाबद्दल विचारले असता त्यांनी त्याबाबत बोलणे त्यांनी टाळले.

संभाजीराजेंनी ठोकला होता लोकसभेसाठी शड्डू :

जुनी जखम अजून विसरलेलो नाही, लोकसभा लढणारच! असा इशारा देत संभाजीराजेंनी मैदानात उडी घेतली होती. आपली काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले होते. पण पक्षात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळेल अशी अट घालण्यात आली होती.

Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला”; CM शिंदेंचा खोचक टोला

संभाजीराजेंनी मात्र ही अट धुडकावली. स्वराज्य संघटनेशिवाय आपण कोणत्याही पक्षाकडून उभे राहणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. पण त्यानंतर दोन फेब्रुवारीपासून ते नॉट रिचेबल झाले होते. ट्विट करुन उद्यापासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता ते आज माध्यमांसमोर आले असून त्यांनी माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे, असे म्हटले आहे.

 

Exit mobile version