Lok Sabha Elections : “दानवेंनी गद्दारी केल्याने लोकसभेत पराभव”; ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Lok Sabha Elections : “दानवेंनी गद्दारी केल्याने लोकसभेत पराभव”; ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील 2019 मधील निवडणूक. या अटीतटीच्या (Lok Sabha Elections) लढतीत सलग चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पराभूत झाले. ही निवडणूक अनेक कारणांनी गाजली. खैरे यांचा पराभव का झाला याची अनेक कारणे नंतरच्या काळात समोर आली. मात्र, आता खुद्द चंद्रकांत खैरे यांनीच आपल्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. कन्नड शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत त्यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर घणाघाती टीका केली. मागच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी गद्दारी केली म्हणून लोकसभा हरलो, असे वक्तव्य खैरे यांनी केले.

चंद्रकांत खैरे थकलेले नेते, त्यांना टार्गेट करू नका; शिरसाटांनी मेळाव्यातच सांगितले..

उद्धव ठाकरे यांचा दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खैरेंनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराबवाची सल बोलून दाखवली. महाविकास आघाडीत राहूनच आपल्याला आपली संघटना मजबूत करायची आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी जनसंवाद दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच निवडणुकीतील पराभवाचे खापर त्यांच्यावरच फोडले. अनेकांना आमदार करून  मोठं केलं. परंतु, या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली. गद्दारी करून तुम्ही नशीबवान होत नाहीत. लोकसभेची जागा जिंकली मग विधानसभेच्याही जागा आपोआप जिंकतो. मागच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी गद्दारी केली म्हणून लोकसभा हरलो, असे माजी खासदार खैरे म्हणाले.

चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा! म्हणाले, एकनाथ शिंदे जादूटोणा करणारे, आताही ते..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube