Download App

मुख्याध्यापकांपासून शाळेतील सर्वांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणार; बदलापूर घटनेनंतर GR निघाला

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार घटनेनंतर पालकमंत्मंरी मंगलप्रभात लोढा यांनी शाळांना नियमावली दिली आहे. त्यामध्ये काही सुचना केल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

Badlapur Sexual abuse Case : बदलापूर येथील आदर्श शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर मोठ आंदोलन उभ राहिलं आहे. (Badlapur) दरम्यान, आणच्या मुली शाळेतही सुरक्षित नाहीत मग आम्ही कुठ जायचं आता संतप्त सवार आता पालक विचारायला लागली आहेत. त्यावर आता सरकराने मोठी घोषणा केली आहे. याबाबतचा जीआरदेखील जारी करण्यात आला असून, सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक असणार आहे.

बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अनेक सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया

काय आहे शासन निर्णय?

– शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक

– शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश

– सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक

– शाळांमध्ये तक्रार पेटींचा देखील प्रभावीपणे वापर व्हावा

– सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन

– शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश

– राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीचे देखील गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असणार

– सोबत आणखी सहा सदस्य समितीत असणार

– शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षणाधिकाऱ्यांना सांगावा अन्यथा कारवाई आदेश

शैक्षणिक संस्थांना सूचना

महिला व बालकांवरील अत्याचाराचं वाढतं प्रमाण थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न आणि उपाययोजना करण्याच्यादृष्टीने कौशल्य रोजगार व उद्योजगता मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र लिहिलं असून, या संदर्भात मुंबई उपनगर परिसरातील सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना याबाबत सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

संरक्षणाची जबाबदारी

महिला आणि मुलींना स्व संरक्षणाचे धडे द्यावेत, त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर महिला व बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारसह समाज म्हणून आपल्या सर्वांचीच आहे, त्यामुळे असे अनुचित प्रकार घडू नयेत, याकसाठी आपण सर्वांनी जागृत रहावं, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने मी करत आहे असंही मंत्री लोढा म्हणाले आहेत.

Video : सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचं पालन करावं; बदलापूर घटनेवरून राऊत न्यायलयावर संतापले

follow us