केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संध्याकाळी वेळ नव्हता म्हणून भर दुपारी ‘महाराष्ट्र भूषण’वितरणाचा कार्यक्रम दुपारी करण्यात आला. कार्यक्रमात सगळे व्हीआयपी छपराखाली होते आणि अप्पासाहेबांचे श्रीसेवक हे तळपत्या उन्हात होते. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारतर्फे देण्यात आले आणि आप्पासाहेब यांचे लाखो श्रीसेवक आहेत महाराष्ट्रात आणि हे अनुयायी खारघरला जमणारच होते आणि त्यासाठी सरकारने जी तयारी करायला हवी होती ती फक्त व्हीआयपी साठी केली गेली असं माझं म्हणणं आहे.
Maharashtra Bhushan Award ceremony : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेड आक्रमक
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आप्पा साहेबांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचा सन्मान सोहळा पाहण्यासाठी आले. पण भर दुपारी हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात लाखो भक्तांचे स्वागत करण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांची सोय पाहिली, नाहीतर वेळ म्हणून हा कार्यक्रम संध्याकाळी झाला असता, ऊन उतरल्यावर जर हा कार्यक्रम झाला असता तर ही सगळी दुर्घटना टळली असती. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की आम्हाला या संपूर्ण सोहळ्या वरती अजिबात टीका करायची नाही, कारण आम्ही आप्पासाहेबांना मानतो त्यांच्या कार्याला मानतो. तरीही या सेवेत सहभागी होणाऱ्या सेवकांना, त्रास झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला तो दुःखत आहे. अशा प्रकारे घटना या देशांमध्ये वारंवार होत आहे त्यातून बोध घ्यायला पाहिजे अशा उष्माघात असे अनेक प्रकार या देशांमध्ये घडतात यातून राज्य सरकारने हा कार्यक्रम तयार करताना बोध घ्यायला हवा होता.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा इतिहास अन् मानकरी
कार्यक्रमाला आलेला समाज हा नानासाहेबांचा, आप्पासाहेबांचा त्यांच्या कार्यात सहभागी होणारा समाज होता. तो काही अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी आला नव्हता. तो आप्पासाहेबांचा सेवेकरी होता आणि आप्पासाहेबांसाठी आला होता. तरीही राजकारणी लोकांनी त्यांचा अंत पाहिला. असा गंभीर आरोप त्यांनीकेला आहे.
सरकारकडे तज्ञ असतात, अनुभवी लोकं असतात. त्यांना समजायला हवं होता हा कार्यक्रम किती काळ चालला पाहिजे. कधी संपला पाहिजे कधी सुरू व्हायला पाहिजे किती लांबवांयचा आणि सरकारला फक्त त्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.